ओशाे - गीता-दर्शन

    29-Aug-2023
Total Views |
 
 

Osho 
 
पण आपण कुणी कधी सम्यक पुरे करीत नसताे.पती पत्नीसाठी, वा पत्नी पतिसाठी, वा मुले वडिलांसाठी वा वडील मुलांसाठी. सगळे असम्यकच हाेत राहते. ज्यादिवशी कुणी सुटून जाते त्यादिवशी भारी वज्राघात हाेताे. त्यावेळी वाटते आता काही एक उपाय नाही. म्हणून तर जी मुले वडील मरण्याची वाट पाहतात त्यांच्यावर छाती पिटून रडायची पाळी येते.जेव्हा वडील मरतात तेव्हा, केव्हा एकदा बुड्ढा खलास हाेताे असा विचार कित्येक चिरंजीवांना पडलेला असताे.कितीदा तरी असा विचार करतात. मनच असे आहे. मन असा विचार करत राहते, आपण भले झटकून टाकीत असाल आपण आपल्या मनाला असे समजावित असाल, माणसाने असा विचार करू नये.
 
हा विचार आधी काढून टाक बघू मनातून. अशा प्रकारे विचार करणे बरे नाही. असे मनाला कितीदा सांगत असाल.पण तरी हे काेडगे मन विचार करीतच राहते.मग हेच चिरंजीव छाती पिटून रडायलाही तयार.जीवनाचे हे असंतुलन आहे.वडील जाणार हे निश्चित, मृत्यूच्या तावडीतून काेणी सुटला आहे काय? तेव्हा वडील तर जाणार हे नक्की. पण चिरंजीवांनी थाेडा असा विचार केला असता, की वडील जाणार हे नक्कीच पण थाेडे प्रेम देऊन घ्यावे. त्यांचा थाेडा सन्मान आताच करून घेऊया, त्यांची थाेडी सेवा आताच करून टाकूया, ते जाणार हे जर नक्कीच तर सम्यक प्रयत्न आताच केलेला बरा. असे झाले असते तर ते गेल्यानंतर वर्मी घाव लागल्यासारखे झाले नसते.