ओशाे - गीता-दर्शन

    28-Aug-2023
Total Views |
 

Osho 
दाेन-चार दिवसांनी सांगा फार तर घाई काही नाही त्याची. फक्त एवढे दु:खाचे कारण काय आहे?’चार दिवसांनी ते परतले अन् म्हणू लागले, ‘बहुतेक तुम्ही म्हणता ते बराेबर दिसते. मी आत डाेकावले तेव्हा असे दिसले की मी तिची जेवढी सेवा करायला पाहिजे हाेती तेवढी केली नाही.तिच्याकडे मी जितके लक्ष द्यायला पाहिजे हाेते तितके दिले नाही. वस्तुस्थिती तर अशी आहे की तिच्याबद्दल माझ्यात जेवढे प्रेम असायला पाहिजे हाेते तेवढेही मी तिला देऊ शकलाे नाही.ताे सर्व ताप असा आहे की आता क्षमा मागण्यालासुद्धा जागा राहिलेली नाही.’लक्षात ठेवा जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर जितके करता येईल तितके प्रेम करून घेतले जे सम्यक हाेते तेवढे, सगळी सेवा करून घेतली जेवढी सम्यक हाेती तेवढी.
 
संपूर्ण ध्यान दिले जे सम्यक हाेतं, नंतर त्याच्या मृत्यूने जे दु:ख हाेईल ते फार वेगळ्या प्रकारचे असेल. ते दु:ख आपणास ताेडणार फाेडणार नाही ते घासूनपुसून स्वच्छ करील. ती पीडा आपणास नष्ट नाही करणार.ती आपणास तावून-सुलाखून शुद्ध करील. ती पीडा आपणास गांजवणार नाही.जीवनात काही अनुभव अन् ज्ञान देऊन जाईल. कारण जे हाेऊ शकत हाेतं, ठीक हाेतं, सम्यक हाेतं, ते सगळे आपण करून टाकलं हाेतं. जे जे करणं श्नय हाेतं ते ते सगळं करून झालं हाेतं, बाकी काही उरले नव्हते. बाकीचे तर सगळे या अस्तित्वाच्या आधीनच असते.जीवनातील असमताेल हा असम्यक कर्माचा परिणाम असताे.