वाच्यार्थ: गुण, धर्म असणाऱ्यांचे जीवन म्हणजे खऱ्या अर्थाने जगणे हाेय.गुण, धर्म नसणाऱ्यांचे जीवन हे निरर्थक हाेय.
भावार्थ: जीवन कशाने अर्थपूर्ण बनते, हे चाण्नय सांगतात.
1. गुण-भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेच्या 16 व्या अध्यायात, दैवी संपत्तीत गुणांचे (26 गुण) विश्लेषण दिले आहे. त्यापैकी पहिला ‘अभय’. जी व्य्नती गुणी आहे म्हणजेच जिच्यात सद्गुणांचे प्राबल्य आहे, ती व्य्नती जगाचे कल्याणच करते.
2. धर्म : जी व्य्नती आपले विहित कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडते आणि परमेश्वरावर श्रद्धा ठेवून हे सर्व करते, त्या व्य्नतीचे जीवन सफल हाेते. धर्म नेहमीच त्या व्य्नतीसाेबत राहताे.