चित्त आराधी स्त्रियेचें । आणि तियेचेनि छंदे नाचे । माकड गारुडियाचें । जैसें हाेय ।। 13.793

    17-Aug-2023
Total Views |
 
 

Dyaneshwari 
ज्ञानाप्रमाणेच अज्ञानाचेही वर्णन ज्ञानेश्वर विस्ताराने का करतात हे आपण मागे पाहिले आहे.ज्ञानी माणसाच्या लक्षणांबरेाबर मूर्ख माणसाची लक्षणे रामदास का सांगतात हेही ध्यानात घेण्यासारखे आहे. दैवी संपत्तीप्रमाणे ज्ञानेश्वरांनी आसुरी संपत्तीचेही तसेच वर्णन केले आहे. या दृष्टीने ज्ञानेश्वर अज्ञानी पुरुषाचे वर्णन आणखी पुढे करीत आहेत. ताे लाेभी झालेला असताे.ताज्या सुवासिक कमळाच्या केसरांमध्ये जशी भ्रमरी गुंतून पडते, त्याप्रमाणे त्याची प्रीती स्वत:च्या घराभाेवतीच असते.साखरेच्या ढिगावरील माशी जशी उठत नाही, त्याप्रम ाणे त्याचे चित्त एखाद्या स्त्रीवरून दूर हाेत नाही. बेडूक पाण्याच्या कुंडातच राहताे. चिलट घाणीतच गुंतते. जनावर चिखलातच फसते. त्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य मेल्यावरही रहात्या जागी सर्प हाेऊन वावरताे. नवऱ्याच्या गळ्यात तरुण स्त्री ज्याप्रमाणे मिठी घालते, त्याप्रमाणे ताे आपल्या जिवाला धरून असताे.
 
मधमाशीप्रमाणे श्रम करून ताे आपले घर जाेपासताे.म्हातारपणी झालेल्या एकुलत्या एक पुत्राबद्दल आईबापास केवढे काैतुक असते! तशीच आस्था व प्रेम अज्ञानी माणसास स्त्रीपुत्राबद्दल वाटते. त्याचे चित्त सर्वस्वी स्त्रीच्या ठिकाणी आसक्त झालेले असते. त्याच्या इंद्रियांची धाव स्त्रीकडेच असते. गारुड्याचे माकड जसे मालकाच्या छंदाप्रमाणे वागते, त्याप्रमाणे हा अज्ञानी मनुष्य स्त्रीच्या नादानेवागताे.यापाेटी ताे मित्रांना दूर करून द्रव्य वाढविताे. स्त्रीची भर करण्यासाठी ताे दानधर्म कमी करताे. कुटुंबातील इतर माणसांना फसवताे. असा हा अज्ञानी पुरुष आणि त्याचे मन नेहमी स्त्रीभाेवतीच िफरत असते. सिद्ध केल्यानंतर त्यातील गाेष्टी इतरांपासून गुप्तच ठेवाव्यात.