गीतेच्या गाभाऱ्यात

    17-Aug-2023
Total Views |
 
 

Bhagvatgita 
पत्र सत्ताविसावे तैसा वाग्विलास विस्तारू। गाैतार्थे विश्व भरू। आनंदाचे आवारू। मांडू जगा।। तू आणखी असे पहा. उदेपूरचा राणा प्रताप पंचवीस वर्षांपर्यंत रानावनात फिरत हाेता. त्याच्या बायकाेने आपल्या मुलांसाठी कण्याकाेंड्याची केलेली भाकर लांडग्याने पळवली, हे पाहून ताे फार दु:खी कष्टी झाला.हनिबाल किती उदात्त हाेता. त्याने आपली हयात देशाच्या सेवेत घालवली असताना सुद्धा त्याला परागंदा व्हावे लागले आणि त्याला जाब द्यावा लागला.म्हातारपणात त्या महान पुरुषाचे दु:ख पाहून आपणाला रडू येते.
अशा लाेकांच्याबद्दल कुणी सहानुभूती दाखवली तर आपण समजू शकताे, पण कुणाची निंदा करून जर काेणी दुर्याेधनाबद्दल सहानुभूती दाखवू लागला व दुर्याेधनावर स्तुतीची पुष्पे उधळू लागला तरतर टीकाकारांच्या स्वभाववैचित्र्याचा ताे एक विशिष्ट प्रकार आहे, असे समजून त्या टीकेला आपण राम राम ठाेकावयाचा.
 
तू आपल्या पत्रात लिहितेस ‘दत्तजयंतीच्या उत्सवात आमच्या भजनीमंडळाचे सुंदर भजन झाले. उत्सवात दत्ताबद्दल पुष्कळ सांगण्यात आले. गुरू म्हटले की दत्ताचे नाव घेण्यात येते म्हणूनच गुरुदेव दत्त असे म्हणण्यात येते. शैव-वैष्णव यामध्ये वाद फार आहे. पण दत्तात्रय दाेघांना वंद्य. सर्व जातीमध्ये दत्तसंप्रदाय फार प्रिय आहे. मानवाचा खरा गुरू म्हणजे दत्तात्रय असे सांगण्यात येते. ब्रह्मा, विष्णु, महेश यांचे ऐ्नय दत्तात्रेयामध्ये आहे. दत्त अत्रींचा मुलगा. अत्रींची पतिव्रता स्त्री अनसूया तिच्याकडे ब्रह्मा, विष्णू, महेश गेले. त्यांना तिची परीक्षा घेणेची हाेती. त्यांनी तिला नग्न हाेण्यास सांगितले. अनसूया नग्न झाली व त्यांच्या पुढे आली. मग दत्तात्रय कसा झाला, याबद्दल उत्सवात बरेच सांगण्यात आले.अहाे, देवानी अनसूयेला नग्न हाेण्यास का सांगितले? काही लाेक म्हणतात की देव फार वात्रट हाेते. त्यांना अंगावर वस्त्र असलेली अनसूया पाहून समाधान झाले नाही.
 
उघडी नागडी अनसूया पाहावी अशी त्यांना इच्छा झाली.मी फार भांबावून गेले आहे. अत्रि, अनसूया, दत्त - याबद्दल खरा प्रकार काय आहे? ताे नग्न हाेण्याचा प्रकार ऐकल्यापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे.गीतेच्या गाभाऱ्यांत तुम्ही मला जे सांगता त्यामुळे मला फार आनंद हाेताे. दत्तात्रेयाबद्दल खरा प्रकार काय आहे ते तुम्ही गीतेच्या गाभाऱ्यात मला नीट समजावून सांगा, सांगाल ना? सांगाच....’ तुझा प्रश्न चांगलाच आहे. तू नीट लक्ष दे. ज्ञानेश्वरांच्या भाषेत बाेलायचे म्हणजेतरी अवधान एकले दीजे। असे पहा! गीतेत एक उत्कृष्ट श्लाेक आहेइंद्रियाणि पराण्याहु: इंद्रियेभ्य: परं मन:। मनसस्तु पराबुद्धिर्याेबुद्धे: परतस्तु स:।। इंद्रिये पलीकडची आहेत. इंद्रियांच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे. बुद्धीच्या पलीकडे ‘ताे’ आहे.हा ‘ताे’ काेण त्याबद्दल वाद आहे.शंकराचार्य म्हणतातस बुद्धे: द्रष्टा परमात्मा। रामानुजाचार्य म्हणतात- बुद्धेरपि य: पर: काम इत्यर्थ: