महाद्वार वाेलांडावे। तैसे दृश्य हे सांडावे।।2।।

    08-Jul-2023
Total Views |
 
 

saint 
 
ते म्हणतात की, पृथ्वी ही सात खंडांनी बनलेली आहे. पुराणातील या सप्तद्वीपांची नावे जंबु, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्राैंच, शाक आणि पुष्कर अशी आहेत. आपण काेणत्याही पूजेची सुरुवात करताना स्थान सांगताना, ‘जंबुद्वीपे’ म्हणजे या भारतातील असाच उल्लेख करताे ताे सहज आठवताे.आपण नैवेद्य दाखविताना म्हणताे ते भू: भुव:, स्व:, मह:, जन:, तप: आणि सत्य हे सात भूलाेक आणि अतल, वितल, रसातल, सुतल, महातल, तलातल आणि पाताळ ही सप्तपाताळे मिळून चाैदा भुवने मानली जातात. ब्रह्मा, विष्णू, महेश या प्रत्येकाचे सात मिळून एकवीस स्वर्ग मानतात. पूर्व, आग्नेय, दक्षिण ते ईशान्येपर्यंतच्या आठ दिशांचे अनुक्रमे इंद्र, अग्नी, यम, निऋृती, वरुण, वायू, साेम, आणि ईश्वर हे अष्ट दिशांचे अधिपती मानतात. सूर्याची बारा महिन्यांची धातू, मित्र, अर्यमा, रुद्र, वरूण, सूर्य, भग, विवस्वान्, पूषन, सवितृ, त्वष्टा आणि विष्णू अशी वेगवेगळी रूपे कल्पिली असून त्यांना बारा आदित्य म्हणतात. रैवत, अज, भीम, भव, वाम, वृषाकपि, अजैकपाद, उग्र, अदिर्बुध्य, बहुरूप आणि महान हे अकरा रुद्र मानले जातात.
 
अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिय या नऊ जाती नागांच्या मानतात. कश्यप, अभि भारद्वाज, विश्वमित्र, गाैतम, जमदाग्नी आणि वसिष्ट हे सप्तर्षी आहेत.आज विज्ञानाने आपण याच्या खूपच पुढे गेलाे आहाेत; पण तरीही आपली संस्कृती समजावयाला हे ज्ञान पाेषकच आहे.ही सूक्ष्म पंचमहाभुते पुढे स्थूल रूपात कशी आली त्याची माहिती पुढील समासात येईल. ती श्राेत्यांनी बारकाईने जाणून घ्यावी. त्यामुळे हे दृश्य आणि स्थूल पंचमहाभूतिक विश्व साेडून त्यापलीकडील सत्य परमात्मा जाणण्याची आकांक्षा निश्चितपणे जागृत हाेईल. असे सांगून एका मनाेज्ञ उदाहरणाने श्रीसमर्थ या समासाचा निष्कर्ष सांगतात.ते म्हणतात की, जसे महाद्वार ओलांडल्याशिवाय देवदर्शन घडू शकत नाही, तसे या नाशवंत दृश्य जगाचे खाेटेपण जाणल्याशिवाय सत्य परमतत्त्वाचे ज्ञान हाेत नाही. त्यासाठी वृत्तीवर पडलेली ऐहिकाची छाया, विचार, विवेक व वैराग्याने दूर करण्यातच साधकांचे हित सामावलेले आहे! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299