मग देवा म्हणे देख देख। हे गाेत्रगुरू अशेख। तंव कृष्णमनीं नावेक। विस्माे जाहला।। (1.177)

    08-Jul-2023
Total Views |
 
 

Dyaneshwari 
आपला सेवक पाठीशी घालून त्याचे सारथ्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनापुढे सर्व सैन्याचे दर्शन घडविले. रणभूमीवर एवढा काेलाहल माजला हाेता की, काेण काैरव व काेण पांडव हेही सामान्य माणसास समजेनासे झाले. श्रीकृष्णाचा पात्र्चजन्य व अर्जुनाचा देवदत्त या शंखांचा आवाज एवढा माेठा झाला की, आता ब्रम्हांडाचे तुकडे हाेणर असे वाटले.भीमाचा पाैण्ड्र, युधिष्ठिराचा अनंतविजय, नकुलाचा सुघाेष, सहदेवाचा मणिपुष्पक इत्यादींचा काेलाहल सर्वत्र माजला.तीनही लाेक डळमळून गेले. मेरुरूमंदार पर्वत हेलकावू लागले. समुद्रांचे पाणी कैलास पर्वतापर्यंत पाेहाेचले. पृथ्वी उलटी हाेण्याची वेळ आली. तीवर नक्षत्रांचा सडा पडला.एकेक वीर एकमेकांचे निरीक्षण करू लागले. सर्व धनुर्वीर बाणांचा वर्षाव करण्यास सिद्ध झाले. अशा या ऐन प्रसंगी अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला, ‘ देवा, रथ लवकर सिद्ध करा व दाेनही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करा.
 
युद्ध करणाऱ्या वीरांना एकदा मला पहावयाचे आहे.’अर्जुनाचे हे म्हणणे ऐकून श्रीकृष्णांनी त्याचा रथ दाेनही सैन्यांमध्ये आणून उभा केला. अर्जुनाने सर्व सैन्याकडे दृष्टी टाकली. शत्रुपक्ष म्हणून काेण हाेता ? पितृतुल्य वडील माणसे, आजे, गुरू, मामा, बंधू, मुलगे, नातू, सखे, साेयरे हे सर्व युद्धाला सज्ज झालेले अर्जुनाने पाहिले. आपल्याच बांधवांशी युद्ध करून त्यांच्या रक्ताने माखलेल्या सिंहासनावर आपण बसणार की काय ? अशी शंका अर्जुनाच्या मनात निर्माण झाली. अर्जुन क्षत्रियाचा धर्म विसरला. त्याच्या मनात करुणा उत्पन्न झाली व ताे सर्व सैन्याकडे पाहून श्रीकृष्णाला म्हणाला, ‘पहा पहा, हे सर्व आपले भाऊबंद, आपले गुरुजन, सर्व आपल्याच गाेत्राचे.’ अर्जुनाच्या मनातील माेहजन्य हा विकल्प पाहून श्रीकृष्णांना आश्चर्य वाटले.येथूनच गीतेच्या तत्त्वज्ञानाला प्रारंभ हाेताे.