गीतेच्या गाभाऱ्यात

    08-Jul-2023
Total Views |
 
 
पत्र तेविसावे
 
Bhagvatgita
केव्हा केव्हा आपण प्रामाणिकपणाने कर्तव्य करत असताना आपणाला जे अनुभव येतात ते पराकाष्ठेचे आश्यर्चकारक असतात.
तुला एक उदाहरण सांगताे. इंग्लंडचा आयर्लंडशी तह झाल्यावर डी. व्हॅलेरा याच्या काही अनुयायांना ताे तह मान्य नव्हता. कारण ते लाेक निर्भेळ स्वातंत्र्याकरता लढले हाेते. मग जे मित्र खांद्याला खांदा लावून लढले हाेते, त्यांच्यामध्येच लढाई हाेते. या कालखंडाच्या इतिहासात महाभारतातल्या युद्धाप्रमाणे काही उज्ज्वल देखावे दिसू लागले. एका माणसाला पकडण्यात आले व त्याला देहान्ताची शिक्षा झाल्यावर ती शिक्षा अमलात आणण्याचे काम त्याच्या मित्रावर आले. त्या मित्राने अत्यंत प्रामाणिकपणाने आपली कर्तव्यनिष्ठाबजावली.मग मात्र ताे एकदम निश्चेष्ट पडला. काही वेळाने त्याला सावध केल्यानंतर त्याच्या हातात एक कागद मिळाला.
ताे कागद म्हणजे ज्या मित्राला ठार मारण्यात आले हाेते त्याचे मृत्युपत्र हाेते.
 
त्या मृत्युपत्रात पहिल्या मित्राने लिहिले हाेते- ‘‘तुझी कर्तव्यनिष्ठा पाहून मी थक्क झालाे. केवळ कर्तव्यनिष्ठेपायी माझ्यासारख्या परम मित्राला ठार मारणेस तू तयार झालास हे पाहून मी तुला वंदन करताे. मी मेल्यानंतर जास्तीत जास्त तूच रडशील. प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठा यांनी माेहित हाेऊन माझी सारी इस्टेट मी तुला देत आहे.’’ धर्माबद्दल तू आपल्या पत्रात काही लिहिले आहेस.या बाबतीत असे लक्षात घे कीआहारविशेष, आचारविशेष, विचारविशेष- यामध्ये खरा धर्म साठवलेला नसून खरा धर्म माणुसकीतआहे.माणुसकी ही सर्व कृत्रिम भेदापलीकडील वस्तू आहे.सत्य, साैजन्य व साैंदर्य ही जीवनाची तीन मजली इमारतआहे. या इमारतीचा पाया माणुसकी आहे. हा पाया घट्ट नसेल तर ही इमारत खाली पडेल.
 
सिंध हैद्राबाद येथील तुरूंगात असताना तत्त्वज्ञ वामन मल्हार जाेशी यांना जाे अनुभव आला ताे मननीय आहे.राेज 40 पाैंड जाेंधळे पिसण्याचे सक्त काम त्यांना दिले असता त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी जाे मुकादम कैदी ((Convict overseer)) हाेता, ताे पठाण हाेता. त्यावेळी रमजानच्या उपासामुळे ताे कृश झाला हाेता. त्याची भाषा, त्याचा धर्म, त्याची जात निराळी हाेती. ताे शिक्षित नव्हता. पण वामन मल्हारांना हडकुळ्या प्रकृतीमुळे ते सारे दळण दळता येणार नाही व दळण दळले गेले नाही तर त्यांना आणखी कडक शिक्षा हाेईल म्हणून ताे पठाण स्वत:हून त्यांना चक्की पिसण्यास मदत करी व त्यांचे बरेच दळण दळून देई. त्या पठाणाचे काम म्हणजे वामन मल्हारांच्याकडून काम करून घेणे;
 
त्यांना दळण्यांत मदत करणे हे त्याचे काम अजिबात नव्हते, बऱ्याच दिवसांचा उपवास, दिवसा पाेटांत अन्न नाही, अशा स्थितीत ताे चक्की पिसू लागला म्हणजे घामाघूम व्हायचा व खूप खूप दमून जावयाचा.ताे प्रकार पाहून वामन मल्हार म्हणू लागले- माणुसकी हाच खरा धर्म.* * * श्रीमंताला श्रीमंती शिकवावी लागत नाही, गरिबाला गरिबी शिकवावी लागत नाही; पण माणसाला माणुसकी मात्र शिकवावी लागते. धर्माच्या मंदिराचा गाभारा आहे माणुसकीचा. ज्याला माणुसकी नाही ताे धार्मिक नव्हे.अध्ययन करून मनुष्य धर्मज्ञ हाेईल, पण धार्मिक हाेणार नाही. माणुसकीचा प्रकाश पडला म्हणजेच अधर्माचा अंधकार नाहीसा हाेताे. शाेभा आहे, पण सुगंध नाही अशा फुलाची जी किंमत तीच किंमत विद्वत्ता आहे.