मूळमाया सूक्ष्मदृष्टी । वाेळखावी ।।2।।

    06-Jul-2023
Total Views |
 
 

saint 
 
आकाशाइतकाच वायूही स्थिर असताे; पण आकाशात जाे हलका प्रतिकार हाेताे ते वायूचेच रूप आहे.अशा तऱ्हेने प्रत्येकांत अन्य चारीही पंचभूते सूक्ष्म रूपाने कशी सामावली आहेत हे श्रीसमर्थ तपशिलाने स्पष्ट करतात. या सर्व शक्ती मायेच्या पाेटी जन्माला आल्या; पण त्या ही दृश्य सृष्टी निर्माण हाेण्यापूर्वी सूक्ष्मरूपानेच अस्तित्वात हाेत्या. त्या पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले दृश्य स्वरूप व त्यांनी घेतलेली विविध वस्तुमानांची रूपे तेव्हा विस्तारली नव्हती.थाेडक्यामध्ये हे दिसणारे ब्रह्मांड निर्माण हाेण्यापूर्वीच्या या सूक्ष्म गाेष्टी आहेत व म्हणून त्या दृश्य ज्ञानाने जाणता येणार नाहीत. त्या जाणून घेण्यासाठी परमेश्वराच्या कृपेने प्राप्त झालेली सूक्ष्म दृष्टीच आवश्यक आहे. त्या सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर परब्रह्म, त्याचा भाग असलेली अव्यक्त मूळमाया, त्या मूळमायेतून निर्माण झालेली माया, मायेतून निपजलेले त्रिगुण आणि त्या त्रिगुणांतील तमाेगुणापासून सूक्ष्म रीतीने निर्माण झालेली पंचमहाभूते यांचे यथातथ्य ज्ञान साधकाला हाेऊ शकेल.
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299