चाणक्यनीती

    06-Jul-2023
Total Views |
 
 
 

Chanakya 
 
‘पुढील’ याेनीत जन्म घेताे. (उदा. अमिबा ते माणूस.) सर्वांत शेवटी त्याला मानवजन्म मिळताे, जाे अत्यंत दुर्लभ आहे. त्यात सत्कर्मे केल्यास मनुष्यजन्माचे सार्थक हाेते व चारही पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम, माेक्ष) व्यवस्थित पार पाडल्यास ताे जन्ममरणाच्या फ ेऱ्यातून मुक्त हाेताे, म्हणजेच त्याला माेक्ष मिळताे. त्यानंतर ताे परतत्त्वात विलीन हाेताे, त्याला परमेश्वरसुखाचा लाभ हाेताे.
 
बाेध : मनुष्यजन्मातच त्याला माेक्षप्राप्तीची संधी मिळते. कर्म करताना चुका झाल्यास त्याची फळे ही मनुष्याला या जन्मातच भाेगावी लागतात.म्हणून सत्कर्मे करीत राहिल्यास मनुष्य जीवनाचे सार्थक हाेते, माेक्षाची प्राप्ती हाेते. त्यामुळे ‘मागे’ जायचे की ‘पुढे’ ते आपणच ठरवायचे असते.कारण मनुष्याला पुनर्जन्म मिळताे ताे चुका सुधारण्यासाठीच, असे मानले जाते