गीतेच्या गाभाऱ्यात

    06-Jul-2023
Total Views |


पत्र तेविसावे

Bhagvatgita
उघडी पाटी हीव वाजे।। घाेंगडे देईल ताे एक दाता। बापरखुमादेवीवरा मागाे रे आता।। ज्ञानेश्वरांना देवाची भेट हाेत नव्हती. त्यांना वियाेग सहन हाेत नव्हता. त्यांच्या जीवाला फार कष्ट हाेत हाेते. ते म्हणतात - पडिले दूरदेशी मज आठवे मानसी। नकाे नकाे हा वियाेग कष्ट हाेताती जिवासी।। दिनु तैसी रजनी मज जाली गे माये। अवस्था लावूनि गेला आझूनी का नये।। हे अभंग पाहून तुझी खात्री हाेईल की ज्ञानेश्वरांच्या जीवनांत आत्यंतिक तळमळीची अवस्था आली हाेती.त्या अवस्थेमध्ये ज्ञानेश्वरांना इतका त्रास हाेत हाेता की - त्यांना वाटत हाेते की - चंदनाच्या चाेळीनेदेखील आपले सर्वांग पाेळते आहे. ज्ञानेश्वरांच्या आत्यंतिक तळमळीची अवस्था दाखवणारा खालील अभंग फारच उत्कृष्ट आहे.घन वाजे घुणघुणा वारा आहे रुणझुणा। भुवतारकु हा कान्हा वेगी भेटावा का।। चांद वाे चांदणे चापे वाे चंदन। देवकीनंदनेविण नावडे वाे।।

चंदनाची चाेळी माझे सर्वअंग पाेळी। कान्हाे वनमाळी गी भेटावा का। सुमनाची सेज सीतळ वाे निकी। पाेळे आगीसारिखी वेगी विझवा का।। तुम्ही गातसा सुस्वरे ऐकाे नेदावी उत्तरे। काेकिळे वाजवि तुम्ही बाईयानाे।। दर्पणी पाहाता रूप न दिसे वाे आपुले बापरखुमादेवीवर विठ्ठले मज ऐसे केले।। हा अभंग पाहिल्यावर तुझ्या शंकेचे निरसन हाेईल असे वाटते.तू आपल्या पत्रात लिहितेस - ‘‘ईश्वर: सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । ईश्वर सर्वांच्या हृदयात आहे. हा गीतेतील विचार तुमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे.एकदा वारकऱ्यांपुढे प्रवचन करताना तुम्ही म्हणाला हाेता देह म्हणजे पंढरी आहे व आपल्या देहात असणारा देव म्हणजे पंढरपूरचा विठाेबा आहे. त्या विठाेबाला, त्या देहातल्या देवाला, तुम्ही ओळखा म्हणजे तुम्ही खरे वारकरी व्हाल.तुम्ही न्यायाधीश म्हणून वारकरी लाेक काही बाेलले नाहीत; पण मला वाटते तुमचा हा विचार वारकऱ्यांना आवडला नसावा.

गीतेच्या दृष्टीने विचार करता तुमचा विचार ठीक आहे. पण, याबाबतीत एखाद्या वारकरी संतांचा आधार तुम्ही देऊ शकाल काय?...’’ अग ईश्वर सर्वांच्या हृदयात आहे.हा गीतेचा महान विचार वारकऱ्यांस पटण्यास अडचण नसावी. ज्याला अंत:करणातला देव कळला नाही ताे संतच नव्हे. जाे डाे्नयाने माेठा ताे पंत, व जाे अंत:करणाने माेठा ताे संत.संतपण तेव्हाच येते की, जेव्हा माणसाला अंत:करणातील देवाचा साक्षात्कार हाेताे.तुला आधार पाहिजे आहे.हरिनाम गर्जत नाही भयचिंता। ऐसे बाेले गीता भागवत।। असे म्हणणाऱ्या चाेखामेळ्यांचे अभंग तू नीट वाचून पहा. महान वारकरी संत चाेखामेळा म्हणतातदेहे देखिली पंढरी । आत्मा अविनाश विटेवरी ।। ताे पाहा पांडुरंग जाणा। शांति रु्निमणी निजांगना ।। आकारले तितुके नासे। आत्मा अविनाश विठ्ठल दिसे ।। ऐसा विठ्ठल हृदयी ध्यायी। चाेखामेळा जडला पायी ।। परमार्थाच्या प्रांतात तू आता खराेखर सज्ञान झाली आहेस. तू आता खूप विचार करू लागली आहेस.