अवघे जन गडी । घाला उडी भाईंनाे ।।2।।

    05-Jul-2023
Total Views |
 

saint 
 
आपण आचरत असलेल्या मार्गावरून संसारातील जीवाने चालावे ही तुकाराम महाराजांची अपेक्षा आपण पूर्ण करू शकताे का? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. या मार्गाचे आचरण केल्याने आपलेच भले हाेणार आहे हे लक्षात घेतले तर कदाचित हा मार्ग आवडेल. या मार्गाचे आचरण करण्यासाठी संसार साेडून संन्यास घेण्याची गरज नाही किंवा खडतर तपश्चर्या करण्याची गरज नाही. गरज आहे ती फक्त आपली मानसिकता बदलण्याची. आपल्या मनातील विकारांचे निर्मूलन केले म्हणजे झाले. अर्थात ईर्षा, द्वेष, मत्सर, काम, क्राेध, स्वार्थ, अहंकार, नकारात्मक वृत्ती आपणाला नष्ट करावी लागेल.
 
या सर्वांच्या निर्मितीला आपणच कारणीभूत असल्याने यांना काढून टाकण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. या सवांर्चे गमन म्हणजे समता, बंधुता, निस्वार्थ प्रेमाचे आगमन हाेय. हे आगमन दुसरे तिसरे कांही नसून तुकाराम महाराजांच्या मार्गाचे आचरण हाेय. अर्थात भवसिंधू तरूण जाण्याचा मार्ग हाेय. या मार्गाची सुरुवात आजपासून, आत्तापासून आपल्या कुटूंबातून करावी. या मार्गावरून चालतांना मिळणारा आनंद आपणाला आत्मानंदाची अनुभूती दिल्याशिवाय राहणार नाही.
जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448