तरुणसागरजी

    05-Jul-2023
Total Views |
 

Tarunsagarji 
 
प्रत्येक दिवस, प्रत्येक सकाळ एक नवे जीवन आहे. नव्या जीवनाच्या जाेडीला मनदेखील नवे असायला हवे.असेही हाेऊ शकते की, एका रात्रीत तुमचा शत्रू मित्र बनला असेल आणि मित्र शत्रू! म्हणून सकाळी ज्याला कुणाला भेटाल, त्याच्याशी अनाेळखीपणाने वागा.
सकाळी देवाला प्रार्थना करताना म्हणा, ‘हे देवा! मी या दिवसाकरीता तुझे आभार मानताे आणि असा संकल्प करताे की, आज मला कुणी कितीही भडकवाे, मी शांत राहीन आणि आगीला पाण्याने विझवून शांत करीन!’’.