काय दरा करील वन । समाधान नाहीं जव ।।1।।

    29-Jul-2023
Total Views |
 
 

saint 
 
मानसिक समाधान हे मानवी जीवनाच्या स्थैर्यतेचा आधारस्तंभ हाेय. हा आधारस्तंभ मजबूत करण्याची जबाबदारी ही ज्याने त्यानेच पाळायला हवी. संसारात प्रत्येक गाेष्ट, घटना ही आपल्या इच्छेप्रमाणे हाेईलच असे नाही. त्यामुळे बऱ्याचवेळा इच्छेच्याविरुध्द घडलेल्या घटनांचा शाेक किंवा चिंता करण्याची वेळ आपल्यावर येते.अशावेळी आपण आपल्या मनाला आवर घालून स्थिर करणेच याेग्य असते. आपल्या इच्छेविरुध्द घडत आहे किंवा घडणार आहे म्हणून त्यापासून पलायन केल्याने मनाला समाधान मिळेल असे नाही. कारण काेठेही गेले तरी मनात विचाराचे वारे हे वाहतच राहते.
 
इच्छा, अपेक्षा, माेह, काम, क्राेध, अहंकार, ईर्षा, द्वेष, मीपणा आदिची उलथापालथ सातत्याने मनात चालू असेल तर घरदार साेडून दऱ्या डाेंगरात, गुहेत, वनात गेला तरी समाधान मिळत नाही. या अनुषंगाने बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, काय दरा करील वन । समाधान नाही जव ।। बहुतांश वेळा मनाच्या अस्थिरत्वाला आपणच कारणीभूत असताे. मनात येणाऱ्या नकाे त्या विचाराला कृतीत उतरविण्यास आपली बुध्दि पाठींबा देत असेल तर मन स्थिर राहूच शकत नाही.
जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448