सार्थकाचे सार्थक जाले । बहुतां दिवसां भेटले । आपणासि आपण ।।1।।

    24-Jul-2023
Total Views |
 
 

saint 
 
आपला देह म्हणजेच आपण अशा देहबुद्धीने आपण प्रपंची लाेक वागत असताे आणि त्यामुळे देहाच्या दु:खाने दु:खी हाेत असताे. परब्रह्म देहातीत आहे.तेव्हा त्याला जाणण्यासाठी आपणही स्वत:च्या देहापलीकडे जाऊन देहातीत व्हावयास हवे.मी देह आहे ही भावना टाकून दिली की मग विदेहीपण येते आणि मग दिसणाऱ्या सुखाचा, पंचेंद्रियांच्या ऐश्वर्याचा लाेभ संपूनविदेहीपणाची मुक्ती आणि त्या अवस्थेचे ऐश्वर्य प्राप्त हाेते.ही आत्मबुद्धी बाणण्याची खूणच आहे. ती बाणण्यासाठी केवळ अध्ययन, शास्त्रांचे ज्ञान किंवा वेदांची घाेकंपट्टी उपयाेगी पडत नाही,
 
तर त्यासाठी मनापासून लागलेली परमेश्वरप्राप्तीची तळमळ आत्यिाला वैराग्य व विवेक यांच्या विचाराची आणि प्रत्यक्ष कृतीची जाेड द्यावयास हवी आणि त्यासाठी संतांची संगती अमाेघ काम करणारी आहे. संत तरी काय सांगतात हे पाहिले तर ते आपल्याला आपण देहरूप नसून परमात्म्याचा अंश आहाेत आणि त्या अंशरूपाने प्रत्यक्ष परमात्माच आहाेत हेच सांगत असतात. त्यांचा ताे उपदेश सदासर्वकाळ हृदयी धरावा हे सांगताना श्रीसमर्थ म्हणतात - साेहं आत्मा आनंदघन । अजन्मा ताे तूंचि जाण । हेचि साधूचे वचन । सुदृढ धरावे ।।33।। साधकाने या उपदेशाचा कधीही विसर पडू देऊ नये.ज्या आत्म्याला जन्ममरण नाही असा आत्मा म्हणजे मी आहे या अर्थाचे मूळ सूत्र ‘साेहम्’ हे चिरंतन सत्य आहे.