म्हणून तर आपण याच्याशी सहमत व्हाल, जेवणानंतर झाेप आल्यासारखे वाटते.झाेपेचे आणखी एखादे वैज्ञानिक कारण काहीच नाहीये. झाेपेचे वैज्ञानिक कारण एवढेच आहे की, आपण भाेजन घेता तेव्हा लगेच चेतना पाेटाकडे प्रवाहित हाेते.मस्तक जणू काही चेतनाशून्य हाेऊन जाते, त्यातून सगळी चेतना निघून जाते. त्यामुळे मस्तक धुंद हाेते.झाेपेने ग्रस्त हाेते, तंद्रीने घेरले जाते. जास्त जेवण घेतले तर जास्तच झाेप येऊ लागेल, कारण पाेटाला इत्नया चेतनेची गरज आहे की आता डाेके कामच करू शकणार नाही.म्हणून जेवणानंतर डाे्नयाचे काहीही काम करणे अवघड असते.
आपण जर जबरदस्तीनं काम केलेच तर अन्नपचनात अडचण येईल, कारण अन्न पचण्यासाठी जेवढ्या चेतनेची गरज असते, तेवढी चेतना पाेटाला उपलब्ध हाेऊ शकत नाही, तेव्हा जास्त जेवण घेतले तर, चेतना पाेटाकडे वळेल.पण कमी जेवण घेतले वा भुकेलेच राहिलाे तरी चेतना पाेटाकडे जाईल. गरजेपेक्षा कमी अन्न घेतले तरी पाेट भुकेची वार्ता देत राहील की आणखी अन्नाची गरज आहे, आणखी पाहिजे आहे, अन् जर जास्त अन्न घेतले तर पाेट म्हणेल, ‘खाणे जास्त झाले आहे एवढ्याची गरज नव्हती.’ आणि पाेट पीडेचे ठिकाण हाेऊन राहील.तेव्हा तुमची चेतना पाेटावरच अडखळून राहील, खाेलवर नाही जाऊ शकणार.कृष्ण म्हणताे, भाेजन असे असावे की कमी पण नाही अन् जास्त पण नाही.