वाच्यार्थ : वाईट राज्यात प्रजेला सुख काेठून मिळणार? वाईट मित्राच्या संगतीत सुख-शांती कशी मिळणार? वाईट पत्नीच्या संगतीत गृहसाैख्य काेठून मिळणार? आणि वाईट शिष्याला शिकवण्याने (गुरूला) यश कसे काय मिळणार?
भावार्थ : वरील चारही प्रश्नांमध्येच त्यांची उत्तरे सामावलेली आहेत.
1. कुराज्य : ‘यथा राजा तथा प्रजा।’ असे म्हटले जाते. राजा दुष्ट असेल तर प्रजाही कुकर्मी असणार, हे निश्चित.