पत्र पंचविसावे
पतिपत्नी परमार्थात रंगून जाऊन विचार विनिमय करू लागले म्हणजे गीता माऊली म्हणते, एथ चातुर्य शहाणे झाले। प्रमेय रुचीस आले। आणि साैभाग्य पाेखले। सुखाचे एथ।। तुला ज्ञानेश्वरीची फार आवड. ज्ञानेश्वरांना वाट पुसत मी तुझ्या पत्राबद्दल माझा अभिप्राय कळवला.अग, असं परमार्थाने भरलेले तुझे पत्र म्हणजेच प्रेमाचे खरे अमृत.तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर असे कीआपल्या जीवनाला भाेगाचा रंग द्यायचा, का भ्नतीचा रंग द्यायचा हे आपणच ठरविण्याचे असते. तू आपल्या जीवनाला भ्नतीचा रंग दे म्हणजे तू सुखी हाेशील.देव आपल्या अंतरंगात आहे. ताे देव आणि भ्नत यांचे नाते पतिपत्नीचे असते. पातिव्रत्याशिवाय भ्नती म्हणजे विचाराशिवाय कृती आहे.
तू असे लक्षात घे की, भ्नती ही कृती नसून वृत्ती आहे.स्वत:ला भ्नत म्हणवणारे काही लाेक दिवसातून एक तास देवाचे नाव घेतात व मग म्हणतात की, आता तेवीस तास कसेही वागले तरी हरकत नाही.अग, पतिव्रता असे म्हणू शकेल का, मी एक तास पातिव्रत्य पाळणार आणि मग तेवीस तास कसेही वागणार? परमार्थाच्या प्रांतात विहार करणारे काही लाेक आपल्या शरीराला फार नावे ठेवतात.तू असे लक्षात घे कीशरीर वाईट नाही, ते देवाचे मंदिर आहे. हे मंदिर स्वच्छ, सुंदर ठेवण्याची खटपट करणे हे चांगले काम आहे.परमार्थाच्या प्रांतातील काही लाेक देहाला नावे ठेवून त्याच्या स्वच्छतेकडे अजिबात लक्ष देत नाहीत. या लाेकांना वाटते की, शरीराबद्दल काळजी न घेणे, त्याच्याबद्दल बेफिकीर असणे म्हणजेच खरा परमार्थ.
तू त्या कल्पनेला थारा देऊ नकाेस.तू मनाशी प्नकी खूणगाठ बांध कीदेह म्हणजे देवाचे देऊळ आहे.देवळात घाण असेल, सुंदरतेचे नाव तेथे नसेल, जिकडे तिकडे अस्ताव्यस्त कारभार असेल, तर आपले मन प्रसन्न कसे हाेईल? त्या दृश्याने आपले मन विषण्ण नाही का हाेणार? गीतेचे सूत्र असे आहे कीप्रसादे सर्व दु:खानां हानिरस्याेपजायते। मन प्रसन्न असेल, तर सर्व दु:खे नाहीशी हाेतात.गीतेच्या वरील सूत्राला पुस्ती जाेडून असे म्हणता येईल की- विषादे सर्वसुखानां हानिरस्याेपजायते। मन विषण्ण असेल तर सर्व सुखे नाहीशी हाेतात.
परमार्थाच्या प्रांतात प्रवास करणे म्हणजे जेणेकरून मन प्रसन्न राहील. मन विषण्ण हाेणार नाही त्याबद्दल खटपट करणे.तू विचारतेस कीअंत:करणातील देव प्रसन्न झाला म्हणजे काय मिळते? गीतेचा सिद्धांत असा आहे की, ताे देव प्रसन्न झाला म्हणजेआपणाला पराकाष्ठेची शांती मिळते.साधुसंतांचे दुकान म्हणजे सराफाचे दुकान, तेथे शांतीचे साेने मिळते.मला पैसा पाहिजे, पुत्र पाहिजे अशी इच्छा करणारे लाेक त्या दुकानात येतात, पण, त्या लाेकांना कळत नाही की चहा किंवा जेवण सराफाच्या दुकानात मिळत नाही. त्यासाठी हाॅटेलमध्ये जायला पाहिजे.