गीतेच्या गाभाऱ्यात

    22-Jul-2023
Total Views |
 
 
पत्र चाेविसावे
 
Bhagvatgita
ज्ञानेश्वरांनी पंढरपूरलाच जाहीर केले की आपण जिवंत समाधी घेणार. पंढरपुरापासून कितीतरी भाविक लाेक ताे साेहळा पाहणेसाठी आळंदीला गेले.हा मूलभूत भेद तू लक्षात घे म्हणजे तुला समजून येईल की जे विद्वान म्हणतात की ज्ञानेश्वरांनी आत्महत्या केली त्यांचे म्हणणे बराेबर नाही.
 
*** ज्ञानेश्वर, नामदेव, इत्यादी संतांनी तीर्थयात्रा केल्यानंतर शके 1218 मध्ये कार्तिकी यात्रेच्या प्रसंगी ज्ञानेश्वरांनी पंढरपूरला जाहीर केले की आपण आळंदीला मुक्कामी संजीवन समाधी घेणार! आश्चर्य व खेद निर्माण करणारी ही वार्ता हाेती.हजाराे वारकरी खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन आळंदीला आले. इंद्रायणीची दाेन्ही तीरे भरून गेली.अल्याड पल्याड पताकांचे भार । मध्ये मनाेहर इंद्रायणी ।। जिकडे तिकडे विठ्ठल गजर हाेत हाेता.आपल्या आवडीचा प्रेमाचा सखा जाणार म्हणून साऱ्या लाेकांच्या डाेळ्यांतून अखंड अश्रुधारा चालल्या हाेत्या.प्राण कासावीस हाेत हाेते. मन तळमळत हाेते.पाण्याशिवाय मासा तडफडावा त्याप्रमाणे जमलेले लाेक तडफडत हाेते.
 
कासावीस प्राण मन तळमळी । जैसी का मासाेळी जीवनाविण ।। ज्ञानेश्वरांचे गुरू निवृत्तिनाथ पण तेही रडू लागले.साेपानदेव, मुक्ताबाई यांनी तर आकांतच केला व बघणाऱ्या लाेकांना दु:ख आवरेना.त्या साऱ्या समुदायात फक्त ज्ञानेश्वरच आनंदाच्या टाेकाला गेले हाेते.सिद्धेश्वरासमाेरील नंदी बाजूला करून त्याच्या खाली असणाऱ्या विवराचे दार माेकळे केले गेले.समाधीच्या जागेत वस्त्र, बेल, तुळस, दुर्वा, फुले टाकून आसन सिद्ध केले गेले.ज्ञानेश्वरांनी-निवृत्तिनाथांनी डाेळ्यात अश्रू येत असताना ज्ञानेश्वरांना आलिंगन दिले.सारे संत कासावीस झाले.
 
नामा म्हणे संत कासावीस सारे । लाविती पदर डाेळियासी ।। निवृत्तीनाथांचे समाधान करण्याचा इतरांनी प्रयत्न केला, पण त्यांना दु:खावेग आवरेना. बांधलेल्या तळ्याचा पाट फुटावा आणि बारा वाटे ओघ वाहावेत तसा प्रकार झाला.बांधल्या पेंडीचा आळा सुटावा आणि रानाेमाळ गवत पांगावे त्याप्रमाणे अश्रू वाहू लागले. निवृत्तिनाथांच्या आईबापांनी आपल्या मुलांना साेडून देहान्त प्रायश्चित्त घेतले त्यावेळी जे दु:ख झाले त्यापेक्षा जास्त दु:ख निवृत्तिनाथांना झाले. काही केल्या निवृत्तिनाथांचे दु:ख आवरेना.बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट ओघ बारा वाट मुरडताती ।। बांधल्या पेंडीचा सुटलासे आळा तृण रानाेमाळ पांगतसे ।। हरिणीविण खाेप पडियेली उदास दशदिशा पाडस भ्रमताती ।। मायबापे आम्हा त्यागियेले जेव्हा । ऐसे संकट तेव्हा झाले नाही ।। नामा म्हणे पेटला हुताशन । करा समाधान निवृत्तीचे ।