ओशाे - गीता-दर्शन

    20-Jul-2023
Total Views |
 
 

Osho 
 
म्हणून सांख्याने, याेगाने आपणांला जे नाव दिले आहे ते आहे - पुरुष.पुरुषचा अर्थ आहे, एका महाप्रचंड शहरी राहणारा, एका प्रचंड शहराचा रहिवासी! आपण स्वत:च एक भलं माेठं नगर आहात, एक माेठ ‘पुर’ त्यात जाे वसताे ताे पुरुष आपण आहात.म्हणून असा पुरुष असणं ही काही फुटकळ वा छाेटीशी घटना नाहीये. आपल्या आत एक प्रचंड महानगर जगत आहे.एवढ्या छाेट्याशा मस्तकात सुमारे तीन अब्ज स्नायूंचे तंतू असतात. एक छाेटासा जीवकाेश हीसुद्धा काही साधी सरळ घटना नाहीये- त्यात खूप जंजाळ आहे.हे जे सात काेटी जीवकाेश शरीरात आहेत, त्यापैकी एकेक सुद्धा अगदी जटील असताे.
 
परवा परवापर्यंत ताे समजून घेणे वैज्ञानिकांना श्नय झालं नव्हतं.आता आता कुठे, त्या जीवकाेशाची माैलिक रचना त्यांना समजू लागली आहे. आता कुठे, ज्याच्या सात काेटी संबंधियांनी आपण निर्मित हाेत असतां त्या छाेट्याशा जीवकाेशाची रासायनिक प्रक्रिया काय आहे, ते समजायला लागले आहे.हे जे आपलं एवढं प्रचंड जाळे आहे त्यामध्ये एक संगीत, एक लयबद्धता, एकता, एक हार्माेनी, सुसंगती नसल्यास आपणांस आत प्रवेश करता येणार नाही.हे जे आपलं नगर आहे, पूर आहे, शरीराचं, मनाचं महानगर, ते पुरेच्या पुरे जर अव्यवस्थित, अराजकमय असेल, जर ही सगळी पुरीच्या पुरी नगरी विक्षिप्त असेल तर आपण आत प्रवेश करू शकणार नाही.