चाणक्यनीती

    20-Jul-2023
Total Views |
 
 
 

Chanakya 
वाच्यार्थ : दुराचार असणाऱ्या राज्यापेक्षा राज्य नसलेलेच बरे. दुष्टच मित्र मिळणार असेल तर मित्र नसणेच चांगले, वाईट शिष्यापेक्षा शिष्य नसलेलाच बरा आणि दृष्ट पत्नीपेक्षा पत्नी नसलेलीच बरी.
 
भावार्थ : चांगल्या समजल्या जाणाऱ्या; परंतु तापदायक गाेष्टी पुढीलप्रमाणे : 1. सुराज्य : सुराज्य म्हणजे व्यक्तीच्या प्रगतीला पाेषक वातावरण असणारे राज्य; पण जेथे राज्यच मुळी कुराज्य (दुष्टांचे/चाेरांचे) आहे तेथे कुणाचे भले हाेणार?