गीतेच्या गाभाऱ्यात

    20-Jul-2023
Total Views |
 
 

Bhagvatgita 
 
लाेक विवेकाला पारखे असतात. त्यांचा सारा कारभार अंधविश्वासावर चालताे’’ परवा एक विद्वान म्हणाले- ‘‘गीतेवर टीका करताना ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये बहार केली आहे हे खरे आहे, पण त्यांनी श्रद्धेवर जाेर दिला आहे. त्यांनी विवेकावर भर दिला असता तर बरे झाले असते. ज्ञानेश्वरीमध्ये विवेकावर जाेर न देता श्रद्धेवर भर दिल्यामुळे वारकरी लाेकांत अंधविश्वास बाेकाळला आहे.’’ तुम्हाला काय वाटतेत्या विद्वान गृहस्थांनी ज्ञानेश्वरी नीट वाचली नाही.ज्ञानेश्वरांनी विवेकावर भर अथवा जाेर दिला नाही असेल म्हणजे सव्वा सहा फूट उंचीच्या माणसाला ‘तू गिड्डा आहेस’ असे म्हणण्याप्रमाणे आहे.ज्ञानेश्वरांच्या हृदयात असणाऱ्या सद्गुरूंनी ज्ञानेश्वरांना विवेक शिकवला.
 
ज्ञानेश्वरीत प्रारंभी ओंकार रूप गणपतीला व सरस्वतीला वंदन करून हृद्यस्थ सद्गुरूंना वंदन करताना ज्ञानेश्वर म्हणतात- मज हृदयी सद्गुरू । जेणे तारिलाे हा संसार पूरु। म्हणवूनि विशेष अत्यादरू। विवेकावरी ।। सद्गुरू वंदन करून झाल्यावर ज्या महाभारतात गीता आहे त्या महाभारताचे महात्म्य वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी विवेकावर भर दिला आहे. त्यांच्या मते महाभारत म्हणजे विवेकवृक्षांचे अभिनव उद्यान आहेकी अभिनव उद्यान । विवेकतरूंचे ।। गीतेबद्दल बाेलताना ज्ञानेश्वर म्हणतात की गीता ही विवेकाची कथा आहे व ती सांगणारा जगश्रेष्ठ श्रीकृष्ण आहे.आधीची विवेकाची गाेठी । वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी ।।