पडिलेती भ्रमें । वाट न कळतां वर्मे ।।1।।

    19-Jul-2023
Total Views |
 
 
 

saint 
मुळात ईश्वर आहे का? हाच प्रश्न अनेकांना पडलेला असताे. अशा अनेकांपैकी ज्याला ईश्वर आहे असे वाटते, त्यापैकी अनेक जण ईश्वराच्या शाेधाचा चुकीचा मार्ग अवलंबतात.अनेकांना तर ईश्वराच्या शाेधाच्या अनेक वाटा दिसतात.नेमके काेणत्या वाटेवरून जावे हे यांच्या लक्षात येत नाही. तप, व्रत, वैकल्ये, उपवास, यात्रा, संन्यास, संसाराचा त्याग, ब्रम्हचर्य असे अनेक मार्ग माणूस डाेळ्यासमाेर आणताे. त्याला जे जमेल त्या मार्गावरून जाण्याचा ताे प्रयत्न करताे. त्या मार्गात यश आले नाही किंवा समाधान झाले नाही तर ताे मार्ग बदलताे.
 
माणूस स्वपरीचयापासून दूर असल्यामुळेच हे सर्व घडते. आपणाला जर खऱ्या अर्थाने स्वपरीचय झाला आहे तर ईश्वर शाेधाच्या मार्गाचा भ्रम हाेण्याचे कारणच नाही. ईश्वराच्या शाेधाचा खरा मार्ग न सापडल्यामुळे माणसाला वेगवेगळ्या साधनाचा, मार्गाचा भ्रम हाेताे. हे सांगतांना तुकाराम महाराज म्हणतात, पडिलेती भ्रमे । वाट न कळतां वर्मे ।। दुर्दैवाने नमूद करावे लागते की, ईश्वर शाेधाचा मार्ग सांगणारे अनेक लाेक स्वत:च ख-या मार्गापासून दूर राहतात. अर्थात यांनाच खऱ्या अर्थाने ईश्वराच्या शाेधाचा मार्ग सापडलेलानसताे.
जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448