काेणताही अतिरेक मग ताे झाेपेचा असाे वा जागण्याचा वा खाण्याचासमता आणण्यात अडचण निर्माण करताे.काेणत्याही गाेष्टीचा अतिरेक व्यक्तित्वाला असंतुलित- अनबॅलन्सड- करून टाकताे.प्रत्येक गाेष्टीचे काही एक प्रमाण असते. ती त्या प्रमाणाहहून कमी वा जास्ती असली तर त्या व्यक्तीचे नुकसान हाेऊ लागते. येथे दाेन-तीन गाेष्टी समजावून घ्यायला पाहिजेत.दिसायला माणूस इतका छाेटासा पण त्याच्या गुंतागुंती ब्रह्मांडाइत्नया असतात. एक आधारभूत व्यक्ती म्हणजे एक अतिशय जटील व्यवस्था असते याची आपणास कल्पनादेखील नसते.म्हणून प्रकृती तितके ज्ञान पण माणसाला देत नसते - तित्नया गुंतागुंती समजून घेतल्या तर जगणे माेठे कठीण हाेऊन बसेल.
एक माणूस छाेटासा दिसताे, पण त्याच्या गुंतागुंती या पूर्ण ब्रह्मांडाच्या गुंतागुंती एवढ्याच असतात.त्याच्या गुंतागुंती काही कमी नसतात. एका अर्थानं हा गुंता ब्रह्मांडाहून जास्त असताे कारण, विस्तार फारच कमी आहे. व्यक्ती आहे आणि गुंतागुंत मात्र ब्रह्मांडाची आहे. एका साधारण शरीरात सात काेटी जीवाणू असतात. आपण स्वत: एक एवढी माेठी वस्ती आहात की, त्याहून माेठी वस्ती या सगळ्या पृथ्वीवर काेठेही नाही.टाेकियाेची लाेकसंख्या फक्त एक काेटी आहे.टाेकियाेची वस्ती सात पट झाली तर जितकी माणसं टाेकियाेत असतील, तितके जीवकाेश एका, एका व्यक्तीत असतात. आपण एक सात काेटी जीवांची वस्ती आहांत.