गीतेच्या गाभाऱ्यात

    19-Jul-2023
Total Views |
 
 
पत्र चाेविसावे
 
 
Bhagvatgita
तात्या मला म्हणाले- ‘‘का काळजी करताेस? आपला कृष्ण कृपाळू, स्नेहाळू, ममताळू आहे. त्याच्याजवळ माग, ताे तुला वाटेत ते देईल.’’ मला वाटलेहा त्रास आता सहन हाेत नाही.मी ठरवलेकृष्णाजवळ पैसा मागायचा. असा पक्का निश्चय करून मी देवघरांत गेलाे. कृष्णाच्या मूर्तीकडे भावभक्तीने पाहिले. अंत:करणात भक्ती प्रेमाचा पूर आला. मला एकदम प्रकाश दिसला.मी म्हटले- ‘देवा! मला भक्ती दे. भक्ती दे. भक्ती दे.’ ताे प्रकाश दिसेनासा झाला, मी बाहेर आलाे.तात्यांना म्हटले- ‘‘पैसा मागायचा असा निश्चय करून मी देवघरात गेलाे, पण भक्ती दे असे त्रिवार म्हटले.’’ झालेला प्रकार तात्यांना सांगितला.तात्या म्हणाले- ‘‘अरे! तुला पैसा पाहिजे ना! प्रकाश दिसला की पैसा मागच. पुन: देवघरांत जा. कृष्ण दयाळू आहे, त्याच्याजवळ पैसा माग.’’ मी पुन्हा देवघरात गेलाे पण पहिल्यासारखाच प्रकार झाला. प्रकाश दिसल्यावर मी पुन्हा त्रिवार भक्ती मागितली.
 
तात्या म्हणाले- ‘‘देव तुला पैसा देईल; पण तू भक्ती मागितलीस ना! त्यामुळे देव तुझे पारमार्थिक कल्याण करेल.नंतर तीन महिने झाल्यावर सांगलीस मुलीला घेऊन आलीस. ज्या शाळेत मी पूर्वी शिकत हाेताे त्या शाळेचे संस्कृत शिक्षक पूजनीय पाटीलशास्त्री ती शाळा साेडून सरकारी हायस्कुलांत शिक्षक म्हणून गेले. आमच्या शाळेतील चांगले विद्यार्थी शाळा साेडून सरकारी हायस्कुलांत जाणेची भीती निर्माण झाली.लगेच आमच्या शाळेचे हेडमास्तर श्री. ताम्हणकर तात्यांना भेटले. व आमच्या शाळेत पहिले दाेन तास (एक चाळीस मिनिटांचा व दुसरा पस्तीस मिनिटांचा) संस्कृत दहावीच्या व अकरावीच्या विद्यार्थ्यांना मी शिकवावे असे ठरले. शाळा आमच्या घराजवळच हाेती.ते दाेन तास घेऊन मी लगेच सायकलने काेर्टात जात असे. मला पगार सुरू झाला व मी वकिलीही करू लागलाे.
 
मला पाेटापुरते पैसे मिळू लागले. पाेटाकरता दागिने विकायचे हा प्रकार भूतकाळात जमा झाला.संसार व्यवस्थित सुरू झाला. तुझी माेठी हाैस अथवा दागिन्यांची हाैस मला त्यावेळी भागवता आली नाही. तरी सर्वसाधारण जरुरीपुरता पैसा मला मिळू लागला.वकिली सुरू करून तीन वर्षे झाल्यानंतर मला चांगलाच पैसा मिळू लागला.तू म्हणतेस की ताे भूतकाळ आठवला की तुला त्रास हाेताे.ताे भूतकाळ आठवला की मला त्रास हाेण्याच्या ऐवजी बरे वाटते. अग, अशा काळात भ्नतीच्या नदीत पाेहत असताना आपणाला जाे आनंद हाेताे ताे अनुभवल्याशिवाय समजायचा नाही.जाे सेवी ताेचि चवी जाणे । येरा सांगता लाजिरवाणे ।।