गीतेच्या गाभाऱ्यात

    18-Jul-2023
Total Views |
 
 
पत्र चाेविसावे

Bhagvatgita 
ती त्याचवेळी राम म्हणायची; पण ती मला म्हणाली- ‘‘राम! माझी इतकीच इच्छा आहे की, तुला शंकरशेठ झालेला पाहावे आणि मग मी मरावे’’ आईच्या आशीर्वादाने मी शंकरशेठ झालाे. मला वाटले - आता माझी आई मला साेडून जाणार. डाेळ्यांत पाणी आणून मी आईला म्हटले- ‘‘आई! तुझ्या आशीर्वादाने मी शंकरशेठ झालाे.आता मरू नकाेस गं!’’ देवाची मी करुणा भाकली. देवाने कृपा केली. आई एक तप जगली; पण आजारी अवस्थेत.तुला एक गुह्य सांगू? आईची मी बारा वर्षे सेवा केली, तेव्हाच कृष्णाची गीता मलाकळली.
आईची सेवा करत असताना भक्तिप्रेमाचे जे भरते येते त्या भक्तिप्रेमात कृष्णाची मूर्ती आपल्या डाेळ्यापुढे नाचू लागते व आपणआनंदाच्या सागरांत पाेहू लागताे.असला आनंद मला मिळत हाेता, पण पैसा मिळत नव्हता.परमार्थाच्या बाजारात भक्ती चलनी नाणे आहे, पण व्यवहाराच्या बाजारात पैसा हे चलनी नाणे आहे.
 
दुपारची भूक भागवण्याकरता आणि चूल पेटवण्याकरता पैसा लागताे. भक्तीने अंत:करणाची भूक भागते; पण पाेटाची भूक भागत नाही.नाइलाज म्हणून- पाेटासाठी म्हणून - मला तुझे दागिने विकावे लागले. तुला त्यावेळी दु:ख झाले हे खरे आहे, पण तुझे दागिने विकताना मला तुझ्यापेक्षाही जास्त दु:ख झाले.तू गर्भार हाेतीस. तुझे डाेहाळे जेवण करणेचे हाेते; पण पैसा नसल्यामुळे तेदेखील मला करता आले नाही.तुला दु:ख हाेणे साहजिकच आहे; पण त्यावेळी मला तुझ्यापेक्षादेखील जास्त दु:ख झाले. एका रात्री खराेखर मी ओ्नसाबाे्नशी रडलाे, पण एकांतात काेणीच जवळ नसताना रडलाे.स्त्रियांचे दु:ख जगाला दिसते, पण त्या प्रमाणात पुरुषांचे दु:ख दिसत नाही.
 
सीतेला रावणाने पळवून नेले; ती ओ्नसाबाे्नशी रडत हाेती. तिचे ते रडणे पाहून आजही जग दु:खी हाेते. सीतेला रावणाने पळवून नेल्यानंतर रामालादेखील पराकाष्ठेचे दु:ख झाले, पण ते दु:ख जगाला त्या प्रमाणात दिसत नाही.तू रामायण वाच. सीतेला रावणाने पळवून नेल्यानंतर राम प्रत्येक वृक्षाला विचारताे आहे- ‘‘सांग, माझी सीता काेठे आहे?’’ त्याच्या डाेळ्यातून घळाघळा पाणी वाहत आहे. एका लतेजवळ ताे आला आहे आणि म्हणताे आहे- ‘‘लते! काही दिवसांनी सीता येथे येईल ना, तेव्हा तिला तू इतकेच सांग की- माझी ही फुले रामाच्या अश्रूंची फुले आहेत.’’ हा रामायणातला प्रसंग वाचला म्हणजे आजही माझ्या डाेळ्यात पाणी येते.तुला त्यावेळी खूप त्रास झाला हे खरे आहे, पण माझा नाइलाज हाेता. दारिद्र्याच्या चट्नयांनी मी पाेळून निघत हाेताे.पहिल्या बाळंतपणाकरता माहेरी गेलीस. दारिद्र्याचे चटके मला असह्य हाेत हाेते.