मग मी त्याप्रमाणे ही फांदी तिच्या ठिकाणी पाेहाेचवेन, मग घरी जायला माेकळा हाेईन.कृपया त्या माणसाला सांगा तू ती फांदी हातातून साेडून दे नुसती, ती पाेहाेचेल आपल्या जागी. ती तुझ्यामुळेच अडचणीत आली आहे. तू पकडून ठेवल्यानं अडकून राहिली आहे. तू साेड, म्हणजे ती आपाेआप निघून जाईल आपल्या जागी....अन चित्ताच्या फांदीला नुसतं डाेलू दे.आपण पाहिलं असेलच. जेव्हा अशा प्रकारे फांदी हातातून साेडून देताे तेव्हा ती एकदम आपल्या जागी जाऊन थांबत नाही. कित्येकदा डाेलते.आधी लांबपर्यंत डाेलते. मग डाेलणे कमी हाेते, मग आणखी कमी, मग आणखी कमी, शेवटी आणखी कमी.
मग लहानसं कंपन हाेतं, आणि अस कंपता-कंपता शांत हाेते, थांबते. का? आपण तिला जाेरानं ओढलं हाेतं, आपण जेवढी शक्ती लावली हाेती ती तिला बाहेर फेकून द्यावी लागते. थ्राेइंग आऊट. ती शक्ती ती फांदी बाहेर फेकून देते, जाेवर ती तुमच्या हाताकडून मिळालेली शक्ती फेकून देत नाही ताेवर ती आपल्या जागी स्थिर हाेत नाही.त्या फेकण्यासाठी ती डाेलते, कापते, ती सारी शक्ती उपसून टाकते. मग आपल्या जागी स्थिरावते.अगदी असंच चित्त अशांतीच्या कारणांनी अडकलेले असते. आपण जे विचारता, ‘शांत कसं व्हावं?’ हा चुकीचा प्रश्न आहे.अशांत कसे झालाेत एवढंच विचारायला पाहिजे आणि कृपा करून जिथं जिथं अशांती दिसते त्या त्या कारणापासून दूर रहा. तरी चित्त आपाेआप थाेडं कापेल, थाेडं डाेलेल. आणखी थाेडं डाेलेल, कमी डाेलेल, आणखी कमी डाेलेल. अन मग परत आपल्या जागी शांत हाेऊन जाईल.