ज्या महात्म्याने आयुष्यभर प्रत्येक जीव मात्रात भगवंताला पाहिले, जीवमात्राची सेवा हीच भगवंताची सेवा मानली. त्या महात्म्याने भगवंताला भक्ति कशी करावी? असा प्रश्न विचारणे आश्चर्यकारकच वाटते.हे खरे असले तरीही महाराजांनी तुम्हा-आम्हाला भक्तीचा खरा मार्ग दाखविण्यासाठी हा प्रश्न उपस्थित केला आहे. आपण संसारात अडकलेले जीव स्वत:लाच खऱ्या अर्थाने ओळखू शकत नाही.त्यामुळे ईश्वराला ओळखणे अत्यंत कठीण आहे. आपण स्वत:ला ओळखावे व खऱ्या अर्थाने प्राणीमात्ररुपी ईश्वरालाही ओळखावे.म्हणून कळत न कळत महाराजांनी ईश्वरभक्तीचा मार्ग आपणाला दाखविला आहे.
अडीअडचणीतसापडलेल्या,गरज असणाऱ्या जीवाला आपण आपल्यापरीने जमेल तेवढी मदत करणे, अन्यायाला वाचा फाेडणे, कर्तव्यात तत्पर राहणे, वडीलधाऱ्यांचा मान सन्मान करणे,देशावर प्रेम जाेपासणे, सर्व जीवमात्रांना समान लेखणे इत्यादी म्हणजेच ईश्वराची खरी भक्ती असल्याचे महाराजांना सांगायचे आहे. आपण नेमके हे सर्व साेडून फक्त मूर्तीसमाेर पान-फुल, अन्न ठेवताे.
उपाशी असणाऱ्यांनाकडे दुर्लक्ष करताे. हे चुकीचे असेल.अशा चुका हाेऊ नयेत.
जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448