हा फरक आपण नीट लक्षात घ्या बरं का.मी अशांत का आहे? अशी अशांतीच्या कारणांची चाैकशी, खाेटी शांती धारण करणारा माणूस चुकूनसुद्धा करीत नाही.ताे फक्त कसंबसं शांत रूप लादून घेण्याच्या मागं लागलेला असताे. अन् इकडे आत, अशांतीची सगळीच्या सगळी कारणं सर्वच्या सर्व व्यवस्था, एकूण एक जाळं अगदी पूर्ववत, जसं हाेतं तसंच असतं. अन् ताे वरून सर्व शांत करण्याची सर्व व्यवस्था तत्परतेनं करीत असताे, जी व्यक्ती आपल्या अंतरीच्या अशांतीच्या वर शांतीचं आराेपण करीत राहते, ती व्यक्ती अयाेग्य शांतीला उपलब्ध हाेते. असली शांती काही आपणास ध्यानात नेणारी असू शकत नाही.म्हणजे मग याेग्य प्रकारे शांत व्यक्ती याचा अर्थ जी व्यक्ती आपल्यातील अशांतीची कारणं समजून घेते, ती असा झाला.
लक्षात ठेवा - याेग्य प्रकारची शांती, अशांतीची कारणे समजून, अशांतीला आमंत्रण देण्याची आपली काय व्यवस्था आहे ते समजून घेण्यामुळेच येते. आपण अशांत का आहात, हे तरी आधी समजून घ्या. हीच तर ग्यानबाची मेख आहे.शांत कसं व्हावं ही भानगड समजून घेण्याच्या मागे लागूच नका. ती काही मुळाला हात घालणारी गाेष्ट नाहीये. अशांत का आहात? अशांतीची कारणं दिसून येतील, कारणं आहेतच.आपणच आपणास अशांत करीत असताे. कारणे आपल्या आत असतात.अशांतीची जी कारणे आपल्या हाती आहेत ती अगदी स्पष्ट दिसतील.तेव्हा पाहिजे असेल तर आरामात व्हा ना अशांत, कुशलतेनं व्हा अशांत, तुमच्या शैलीनं व्हा, पूर्ण व्यवस्थेनं व्हा.