तुजशीं अंतराय हाेईल। मग सांगें आमचेें काय उरेल। तेणें दु:खें हियें ुटेल। तुजवीण कृष्णा।। (1.234)

    12-Jul-2023
Total Views |
 

Dyaneshwari 
 
आपण युद्ध करणार नाही हे अर्जुनाने श्रीकृष्णांना अनेक प्रकारांनी समजावून दिले. अर्जुन स्वत:ला विचारी व शहाणा समजू लागला.काैरवांशी युद्ध करावयाचे आहे हे ताे विसरून गेला. स्वजनांचा मृत्यू डाेळ्यांपुढे येऊन त्याच्या ताेंडून शब्दही बाहेर ुटेनासा झाला. ताे श्रीकृष्णांना म्हणाला, दुर्याेधनाला, काैरवांना मारण्यात काय अर्थ आहे? ते आपले बांधवच ना? या युद्धाला आग लागाे. आणि शिवाय देवा, युद्धातील हिंसा करून जे पाप लागेल ते काेणी सहन करावयाचे? कृष्णा, मी पुष्कळ विचार केला, युद्ध करण्यात आपले हित नाही असेच मला वाटते. ‘‘मला विजयाशी काय कर्तव्य आहे? हिंसेने राज्य मिळाले तरी त्याचा काय उपयाेग? या आप्तांना मारून राज्यसुख भाेगावे असे माझ्या मनातही येत नाही. वाडवडिलांना मारावयाचे तर जन्मास कशास यावयाचे?
 
आणि जिवंत रहायचे ते तरी काेणासाठी? आपल्या पुत्राकडून आपला नाश झाला हेच वडीलमाणसांनी पहायचे ना? पण देवा, एवढे कठाेर अंत:करण माझे हाेणार नाही. माझा जीव खर्ची पडला तरी मी युद्ध करणार नाही. इतरांना जिंकावे आणि वडिलांना संपत्ती आणून द्यावी हे आपले कर्तव्य असताना मी त्यांच्याशी युद्ध कसे करू? यांच्यावर शस्त्राचा प्रहार म्हणजे माझ्याच हृदयाला जखम आहे.’’‘‘भीष्म, द्राेण यांचे उपकार कसे विसरू? शालक, सासरे, मामे, बंधू, पुत्र, नातू यांच्यावर रागावणेसुद्धा मला शक्य हाेणार नाही.त्रैलाेक्याचे राज्य मिळाले तरी मी युद्ध करणार नाही.देवा, आणखी असे हाेईल की, गाेत्रजांच्या वधामुळे मी पापाचा धनी हाेईल व माझ्या स्वाधीन झालेला तू मला अंतरशील. देवा, तुझी जवळीक जर संपली तर माझे सर्वस्वी नुकसान हाेईल. वियाेगाच्या या दु:खाने माझे हृदय ुटून जाईल.’’