ओशाे - गीता-दर्शन

    01-Jul-2023
Total Views |
 
 
 

Osho 
म्हणूनं जे साधकाला मार्गदर्शन करतात त्यांनी त्या साधकाला उद्देशून ‘भय साेडून द्या, मृत्यू घटित हाेईल’ असे म्हणते राहणं उचित आहे. ताे क्षण येईल. आता भीती कब्जा घेईल. असं वाटेल की गेलं. सगळं सगळं खलास झालं, सार संपलं. मी सागरात बुडून गेलाे, गहन खाेलात मी चाललाे, आता परतता येणार नाही. असं अधून मधून म्हणत राहिल्यानं, अशी सूचना मिळाल्यानं हिय्या, हिंमत करण्याची बुद्धी साधकाला हाेऊ शकते. ताे सगळं साहस एकवटून सूर मारू शकताे. जर ही सूचना दिली नाही तर घाबरून ताे साधक पटकन् परतेल, अशीच जास्त श्नयता आहे. परतलेल्या साधकाची माेठीच नाच्नकी स्वत:शीच त्याची आता अशी अडचण हाेऊन जाते की, ध्यानाकडे जायची आता ताे कधीच हिंमत बाळगू शकत नाही.
 
आता ही आठवण त्याचा कायम पाठलाग करील. आता त्याला ध्यान सुचणंच अवघड हाेऊन बसेल.अशाप्रकारे ध्यानातून मृत्युभयाने परतणाऱ्या साधकाला आणखीही एक धाेका आहे ताे सांगताे.शंभरापैकी तीस जण थाेडे विक्षिप्त हाेऊन जातील.त्यांनी जे पाहिलं, मिटण्याचा जाे अनुभव त्यांच्या समीप आला, ताे त्यांचे सगळे स्नायू कंपवून टाकताे. त्यांचे हातपाय कापू लागतील.ते सदान्कदा भीतीनं गाळण उडालेले असे राहतील. इतके की झाेपायलासुद्धा घाबरू लागतील. त्यांचं भय पार वाढेल.म्हणून काेणालाही ध्यानात जायचं असेल, तर त्यानं आधी प्नकी खूणगाठ बांधून ठेवावी की, मृत्यूची प्रतीती हाेणार आहे.खरं पाहू जाता यात भय काहीही नाही, उलट ही मृत्यूची प्रतीती माेठ्या साैभाग्याची आहे.