गीतेच्या गाभाऱ्यात

    01-Jul-2023
Total Views |
 
 

Bhagvatgita 
 
पत्र बाविसावे अशा परिस्थितीत जर आपला खराेखरच प्रेमविवाह झाला असता तर लग्नाच्या अगाेदर तुम्ही काय अट घातली असती? लग्न हाेण्याच्या अगाेदर तुम्ही मला काेणता प्रश्न विचारला असता? ‘‘गीतेच्या गाभाऱ्यात तुम्ही माझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे माेकळेपणाने देत आहा. या प्रश्नाचे उत्तर देखील कृपा करून अगदी माेकळेपणाने द्या....’’
 
*** गीतेच्या गाभाऱ्यात आता तू खराेखरीच सज्ञान झाली आहेस, म्हणूनच आता तुला अशा प्रकारचे प्रश्न सुचतात.तुझ्या प्रश्नाचे उत्तर असे कीजर आपला प्रेमविवाह झाला असता, जर लग्नापूर्वी आपण परस्परांवर प्रेम केले असते तर हुंड्यासाठी मी अडून बसलाे नसताे. माझ्यावर आजन्म प्रेम करण्याबद्दल तुझ्याकडून शपथ घेतली नसती. माझा तू कडेपर्यंत मान ठेवशील का? लग्नानंतर तू मला कधी बाेलणार नाहीस ना? अशा तऱ्हेचे प्रश्न मी तुला विचारले नसते.मी तुला फ्नत एकच प्रश्न विचारला असता- ‘‘माझे आईबाप हीच माझी दैवतं. त्यांना तू कधी दुखावणार नाहीस ना?’’ ‘‘मी कधी दुखावणार नाही’’ असे तुझे उत्तर ऐकल्याबराेबर बाकी काेणतीही, कसलीही अट न घालता माेठ्या आनंदाने मी तुझ्याबराेबर लग्न केले असते.
 
*** तू आपल्या पत्रात लिहितेस- ‘‘नदीचे मूळ व ऋषीचे कूळ शाेधू नये म्हणतात पण शाेधल्याशिवाय माणसाला बरं वाटत नाही. तुम्हाला गीता व ज्ञानेश्वरी जीव की प्राण आहे. कृष्णाचे नाव घेतले की तुमचे अष्ट सात्त्विक भाव जागृत हाेतात. ‘‘गीता माझी माता, कृष्ण माझा पिता’’ अशी तुमची आंतरिक भावना आहे. एका प्रवचनात तुम्ही म्हणाला हाेता- ‘‘आपण सामान्य माणसं. आपण सामान्य असलाे तरी कृष्णाचा स्पर्श झाला म्हणजे आपले जीवन सुगंधित हाेते.आपले जीवनपुष्प कदाचित शाेभिवंत हाेणार नाही. पण कृष्णाच्या स्पर्शाने ते खास सुगंधी हाेईल. गीता मातेच्या कुशीत जा. आपण माेठे झालाे नाही तरी गीता मातेच्या आशीर्वादाने चांगले हाेऊ. चांगलं हाेणं महत्त्वाचं आहे.
 
माेठं हाेणं महत्त्वाचं नाही-’’ तुम्ही अजून खूप ज्ञान मिळवता. तुमची विद्यार्थीदशा अजून संपलेली नाही. तुम्ही खूप काम करता. अजून पहाटे उठून अभ्यास करता. ज्ञान व कर्म ह्यावर तुमचा भर असला तरी भ्नती हा तुमच्या जीवनाचा स्थायीभाव आहे.तुम्ही म्हणता की ‘‘गीता माऊली आणि कृष्ण पिताजी यांनी मला भ्नितसागरात डुंबून काढलं आहे.’’ माझी एक शंका आहे. तुमच्या जीवनात असा काेणता क्रांतिकारक प्रसंग झाला की ज्यामुळे तुमच्या जीवनाला कलाटणी मिळाली व तुम्ही परमार्थ मार्गाने प्रवास करू लागला. हा प्रसंग जाणून घेण्याची मला फार इच्छा आहे. कृपा करून कांहीही आडपडदा न ठेवता ताे प्रसंग सविस्तरपणे मला सांगा.माझ्या जीवनातील ताे प्रसंग विद्यार्थीदेशतला आहे.त्यावेळी मी पुण्याला एस. पी. काॅलेजामध्ये बी.ए. च्या वर्गात हाेताे. बी.ए.च्या तीन टर्म झाल्या हाेत्या. दीड वर्ष संपले हाेते. चाैथी व शेवटची टर्म नुकतीच सुरू झाली हाेती.