ओशाे - गीता-दर्शन

    09-Jun-2023
Total Views |
 

Osho
 
ताे सेतू असताे व्य्नतींच्यामध्ये. दुसरा सेतू पाडण्यासाठी कृष्ण अपरिग्रहाचा प्रयाेग करीत आहे. हा दुसरा सेतू आहे व्य्नती आणि वस्तू यांच्यामध्ये. अन् हे लक्षात ठेवा की, व्य्नती-व्य्नतीमधले सेतू आपाेआपच राेजच्याराेज कमी-कमी हाेत जातात. अन् व्य्नती व वस्तू यामधले सेतू दिवसेंदिवस वाढत जातात. आपाेआपच. त्याचं काही कारण आहे. त्याची मी आपल्याला आठवण करून देताे. हे थाेडंसं अजबच वाटेल, पण असं झालं आहे, असं हाेतं आहे, असं हाेण्याची माैलिक कारणं आहेत.व्य्नती-व्य्नतीमधील सेतू राेजराेज कमी हाेत जातात. कारण व्य्नतीबराेबर सेतू बनवण्यामध्ये माेठी झेंगटं असतात. नसत्या कटकटी असतात. त्या सगळ्यात माेठा उपद्रव हा असताे की, दुसरी व्य्नती म्हणजेही जिवंत माणूसच असताे.
 
त्याला गुलाम बनवण्याचा तुमचा प्रयत्न असला तर ती व्य्नती पण आपलं जाळं जाेरानं फेकू लागतेच. पतिदेव कितीही म्हणाेत, ‘मी स्वामी आहे, मालक आहे’ अंदरकी बात वेगळी असते. ते त्यालाही ठाऊक असते. ताे अगदी समजून असताे की ताे ज्यादिवशी कुण्या स्त्रीचा मालक बनला आहे त्याच वेळी ती स्त्रीपण त्याची मालक बनून गेली आहे. त्याच दिवसापासून तीही त्याच प्रयत्नात गुंग आहे.मालकीच्या घाेषणेचा संघर्ष सतत चालू आहे.की, काेण मालक आहे? ही लढाई जीवनभर चालू राहणारच.व्य्नतीव्य्नतीमध्ये संघर्ष स्वाभाविक असताे, कारण प्रत्येक जण स्वाधीन हाेऊ इच्छिताे, पण अक्कलहुशारीच्या अभावी ताे काेणालातरी पराधीन करून स्वाधीन हाेऊ इच्छिताे, जे कधीच श्नय नाही.