आजूबाजूचे वातावरण, आजूबाजूच्या व्यक्ती इ.साहचारी गाेष्टींमुळे ऐकलेली (श्रवण केलेली) गाेष्ट पक्की स्मरणात राहते.
1. धर्मज्ञान : धार्मिक ग्रंथ वाचून त्यांचे तेवढे आकलन हाेत नाही, जेवढे एखाद्या धर्माे पदेशकाचे प्रवचन ऐकून हाते. कारण अशी व्यक्ती कुठलीही गाेष्ट उदाहरणे देऊन विशद करून सांगत असते. समाेरच्या श्राेतृसमुदायाची ग्रहणशक्ती पाहून, समजावून सांगत असते.त्यामुळे श्रवणाने धर्म विशेषप्रकारे जाणून घेता येताे.