पत्र एकाेणिसावे माझ्या रामला शंकरशेठ झालेला पहावा यासाठी माझा जीव तडफडताे आहे. काय हाे, माझी ती इच्छा पुरी हाेईल का?’ ते भाषण ऐकून मला रडू आले. मी डाे्नयावरून पांघरूण घेतले व मनसाे्नत रडलाे.सकाळी उठलाे देवघरात गेलाे. देवाला नमस्कार केला व म्हटले.देवा! माझ्या आईची एकुलती एक इच्छा आहे.तिच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार. तू माझा पाठीराखा हाे आणि तिची इच्छा पुरी कर.’ माझा सारा अहंकार निघून गेला. आतापर्यंत मला वाटायचे की- मी शंकरशेठ आलाे तर माझा शहाणपणा माझी हुशारी शाबीत हाेईल. लाेक मला मान देतील.पण आता मला वाटू लागले कीत्या मानाकरता नाही धडपडायचे, माझ्या आईची, माझ्या देवतेची शेवटची इच्छा पुरी करण्याकरता जास्तीत जास्त धडपडायचे.
मी संस्कृतचा अभ्यास जाेरात करू लागलाे व आईला सांगू लागलाे- ‘आई, इत्नयात मरू नकाेस ग, मी जेव्हा परीक्षेला जाईन तेव्हा मला आशीर्वाद द्यायला तू जिवंत राहा’ आई म्हणालीराम! तुझ्या परीक्षेचा निकाल ऐकेपर्यंत माझा प्राण कुडीतून जाणार नाही.’ संस्कृतचा अभ्यास करताना मला सारखी आई दिसायची.हा अनुभव नवीन हाेता. संस्कृतच्या बाबतीत माझ्या अंगात काही विशेष श्नती निर्माण हाेत आहे, असे मला वाटू लागले.ज्या दिवशी संस्कृतचा पेपर हाेता ताे माझ्या पत्रिकेत घातवार हाेता. तात्या मला म्हणाले- ‘राम आज तुझा घातवार आहे. देवाची खूप प्रार्थना करून जा.’ मी म्हटले- ‘तात्या! आजचा पेपर माझा नाही. आजचा पेपर आईचा आहे’ भारलेल्या नि भारावलेल्या अवस्थेत मी आईला नमस्कार केला. थरथरत्या क्षीण हाताने माझ्या पाठीला स्पर्श करीत डाेळ्यात पाणी आणून आई मला म्हणाली- ‘राम! तुला माझा आशीर्वाद आहे-’ ताे क्षीण हात हातात घेऊन मी आईला पुन: पुन: वंदन केले व परीक्षेच्या मंडपात गेलाे.
आजपर्यंत मी खूप पेपर लिहिले आहेत, पण त्यावेळचा अनुभव अपूर्व हाेता.पेपर लिहिताना माझ्या डाेळ्यापुढे सारखी आई दिसत हाेती. माझ्या डाेळ्यात वरचेवर पाणी येत हाेते आणि मी पेपर लिहीत हाेताे. शुद्ध सात्त्विक प्रेमाच्या पाेटी अंत:करणातील अदृश्य श्नती कशी जागृत हाेते व स्वत:ला विसरून भारावलेल्या अवस्थेत आपण कसे काम करताे याचा दिव्य अनुभव मला येत हाेता.शेवटी निकाल लागला. मुंबईहून तार आली. त्यात म्हटले हाेते - शंभरपैकी नव्याण्णव मार्क पडून राम रानडे पहिला शंकरशेठ व शंभरपैकी एकाेणनव्वद मार्क पाडून शंकर देसाई दुसरा शंकरशेठ.एकाच गावचे दाेन्ही शंकरशेठ हा अभूतपूर्व प्रकार हाेता.सांगलीला आनंदाचे उधाण आले.