गीतेच्या गाभाऱ्यात

    08-Jun-2023
Total Views |
 
 
पत्र एकाेणिसावे
 
Bhagvatgita
शंकरशेठ येणाऱ्याला फार माेठी स्काॅलरशिप मिळत असे.संस्कृत विषयाकरता त्यावेळी काेणतेही टे्नस्टबुक नेमलेले नसे. सारा पेपर (100 मार्काचा) जनरल असे. त्यामुळे शंकरशेठ येण्याकरता फार परिश्रम करावे लागत.त्यावेळी सांगलीला पाटीलशास्त्री संस्कृतचे ्नलासेस चालवित व ज्यांना शंकरशेठची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी ते स्पेशल ्नलास घेत.त्या ्नलासला आम्ही काही विद्यार्थी असू.पाटीलशास्त्री दर पंधरा दिवसांनी संस्कृतचा पेपर घालीत व ताे तज्ज्ञांकडून तपासून घेत.त्या शंकरशेठ ्नलासांत शंकर देसाई (मुंबई काॅर्पाेरेशन सेवानिवृत्त चीफ इंजिनीयर) हा माझा सहाध्यायी हाेता.पाटीलशास्त्री यांनी खूप पेपर घातले व ते तज्ज्ञांकडून तपासून घेतले; पण प्रत्येक पेपरात शंकर देसाई पहिला व मी दुसरा असा क्रम लागे.
 
एकदा तात्या फिरायला गेले हाेते. वाटेत त्यांना विद्यार्थ्यांचा घाेळका दिसला. काही विद्यार्थी म्हणत हाेते - ‘यंदा शंकर देसाई शंकरशेठ येणार’ दुसरे काही विद्यार्थी म्हणाले- ‘नाही, यंदा रानडे शंकरशेठ येणार’ लगेच पहिले विद्यार्थी म्हणाले- ‘ताेंड बघा तुमच्या रानड्याचं! ताे कसला शंकरशेठ येणार! शंकर देसाई शंकरशेठ येणार’ हा संवाद ऐकून तात्यांना फार वाईट वाटले. ते घराकडे आले. देवापुढे बसले व रडू लागले. देवाला ते म्हणाले‘ ‘देवा! माझ्या रामला शंकरशेठ आण.’ मी शंकरशेठ यावे असे तात्यांना खूप वाटत असले तरी एका सांगली गावात जर मी पहिला येत नव्हताे, तर साऱ्या मुंबई प्रांतात मी पहिला कसा येणार? तसंच पाह्यलं तर मी खूप अभ्यास करत हाेताे. रात्री दहापर्यंत अभ्यास करून पहाटे चारला राेज उठत हाेताे व जास्तीत जास्त अभ्यास करत हाेताे. पणप्रयत्न करूनही प्रत्येक पंधरवड्याच्या परीक्षेत शंकर देसाई पहिला येत हाेता व मी दुसरा येत हाेताे.
 
आणि मग- माझी आई आजारी पडली. आईशिवाय सारे जग मला शून्य हाेते. आई आजारी पडली व तिची प्रकृती खालावत चालली. आई आता जगते की मरते अशी अवस्था झाली.मला काही सुचेना. मला वाटू लागले.आई हे माझे दैवत आहे. हे दैवतच मला साेडून गेले तर मी कसा जगणार! एका रात्री मी माजघरात झाेपलाे हाेताे. आई काॅटवर हाेती. रात्री बाराचा सुमार हाेता. मला जाग आली.
तात्या आईच्या काॅटवर बसले हाेते. ते आईचे पाय चेपत हाेते.आई म्हणत हाेती- ‘मी आता जाणार माझ्या रामला सांभाळा’ तात्या म्हणाले- ‘अगं तू जाण्याची घाई करू नकाेस. आपला राम शंकरशेठ येईल.त्याला शंकरशेठ झालेला पहा आणि मग तू जा’ आई म्हणाली - माझीदेखील तेवढीच एकुलती एक इच्छा आहे.