गीतेच्या गाभाऱ्यात

    30-Jun-2023
Total Views |
 
 
पत्र बाविसावे
 

Bhagvatgita 
जयाे नामाेतिहासाेऽयं श्राेतव्याे विजिगीषुणा।। अमित तेजस्वी सत्यवतीपुत्र व्यास. त्यांनी पवित्र एक लाख श्लाेक रचले. हा जय नावाचा इतिहास आहे.विजयेच्छूने याचे श्रवण करावे.आपले महाभारत म्हणजे जय नावाचा इतिहास आहे.व्यासांनी हा ग्रंथ रचिला व मग त्यांत बरीच भर पडत गेली.महाभारताचा नायक कृष्ण आहे. त्याच्या जीवनाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान आहे. साऱ्या तत्त्वज्ञानात ते तत्त्वज्ञान परमश्रेष्ठ आहे. त्या तत्त्वज्ञानामुळे भारतीयच काय पण कितीतरी पाश्चात्त्य पंडितदेखील भारावून गेले आहेत.तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून माझ्यासारखा न्यायाधीश असा निकाल देईल कीतत्त्वज्ञानाच्या प्रांतात कृष्णाच्या तत्त्वज्ञानाचा नंबर पहिला आहे.त्या युद्धभूमीवर मानवाचे खरे कल्याण हाेईल याची खात्री झाल्यामुळे युद्धभूमीवर कृष्ण जे अर्जुनास बाेलला त्याचा धागा घेऊन, विस्तार करून गीतेच्या रूपाने कृष्णाचे तत्त्वज्ञान लाेकांना सांगितले.ही भूमिका तुला समजली म्हणजे गीतेमध्ये कृष्ण जे बाेलला आहे ते सारे भाषण त्याने युद्धभूमीवर केले हाेते, असे मानण्याचे कारण नाही.
 
*** तू आपल्या पत्रात लिहितेस.‘‘एकदा आपल्याकडे एक प्रख्यात ज्याेतिषी आले हाेते. त्यांनी तुमची पत्रिका पाहून सांगितले की- ‘‘तुमचा प्रेमविवाह झाला आहे. तुमची पत्रिका व तुमच्या पत्नीची पत्रिका पाहून मी माझे सारे ज्ञान पणाला लावून सांगताे की तुमचा प्रेमविवाह झालेला आहे.लग्नाअगाेदर सहा ते बारा महिनेपर्यंत तुमचे प्रेम सुरू हाेते व मग त्या प्रेमाचे रुपांतर विवाहात झाले...’’ त्या प्रख्यात ज्याेतिषाचे हे मत ऐकून आपण दाेघांना हसू आले. तुमचे घर सनातनी. लग्नाआधी तुम्ही मला पाहिले देखील नाही. तुमच्या आई वडिलांनी मला पास केली. तुम्ही काॅलेजमध्ये गेला असून देखील मला न पाहता आई वडिलांनी पास केलेल्या मुलीशी लग्न करायला तयार झाला. आपण दाेघांनी एकमेकांना प्रथम पाहिले ते लग्नमंडपातच.अशा स्थितीत प्रख्यात ज्याेतिषाचे मत ऐकून आपणा दाेघांना हसू येणे साहजिक हाेते. मला एक शंका आहे.
 
समजा आपला प्रेमविवाह झाला असता, लग्नाअगाेदर आपण एकमेकांवर प्रेम केले असते, तर लग्न हाेण्याच्या अगाेदर तुम्ही काय अट घातली असती? प्रेमविवाहात देखील काही नवरे हुंड्यासाठी अडून बसतात. काही नवरे बरेच दिवस प्रेम केल्यानंतर लग्न हाेण्याच्या अगाेदर भावी पत्नीला विचारतात- ‘‘तू आता माझ्यावर प्रेम करते आहेस पण तू माझ्यावर काेणत्याही परिस्थितीत आजन्म प्रेम करशील अशी शपथ वाहणेस तयार आहेस का?’’ बरेच दिवस प्रेम केल्यावर काही नवरे आपल्या भावी पत्नीला विचारतात -‘‘तू आता माझा खूप मान ठेवत आहेस. केव्हाही तू मला उलट बाेलत नाहीस. लग्नानंतर देखील तू माझा असाच मान ठेवशील ना? मला कधी उलट बाेलणार नाहीस ना?’’.....लग्नाच्या पूर्वीपासून तुम्ही गीतेचे भ्नत आहा. गीता तुमचा जीव की प्राण.