ओशाे - गीता-दर्शन

    03-Jun-2023
Total Views |
 
 

Osho 
 
इतके दिवस, ते त्याने हाताळलेल हाेतं, त्याच्याशी त्याचा काही संबंध नव्हता.आज घड्याळ फुटून चक्काचूर हाेऊन गेलंय,पण नुसतं ‘अरेरे, दुर्भाग्य तुझं, आजच संध्याकाळी मी ते तुला देऊन टाकणार हाेताे.’ असं मालकांने म्हणताच नाेकर आता चिंतित, दु:खी अन् व्यथित हाेणारच. आता ते घड्याळच नाहीये, तर भेट म्हणून कसं देता येईल, तरी ताे नाेकर दु:खी अन् व्यथित अशासाठी हाेईल की, आता त्याचा त्या नसलेल्या घड्याळाशीही एक ममत्वाचा संबंध प्रस्थापित झाला, ते मिळणार हाेतं, माझं हाेणार हाेतं. आता त्याने आत जागा बनवली. आतापर्यंत ते घड्याळ बाहेर भिंतीवर लटकलं हाेतं. आता ते त्याच्या हृदयाच्या एका काेपऱ्यात लटकलं आहे.
 
जेव्हा वस्तू बाहेर असतात, त्यांनी आत घर केलेलं नसतं. त्यांचा उपयाेग तर चालू असताे पण त्यांची आस्नती आत निर्मित हाेत नसतेतेव्हा कृष्णाला अभिप्रेत असलेला अपरिग्रह फलित हाेताे. जीवन जगायचं पूर्णपणे. पण असं की, जीवन आपल्याला शिवणार सुद्धा नाही.वस्तूमधून, माणसांमधून जायचं आहे अवश्य.पण असं अस्पर्शित. म्हणून अपरिग्रहाच्या ज्या इतर व्याख्या आहेत त्या सरळ आहेत. पण कृष्णाची व्याख्या अवघड आहे. इतर ज्या व्याख्या आहेत त्या साधारण आहेत, ठीक आहेत- ज्या वस्तूंशी माेह निर्मित हाेताे त्या गेल्या की थाेड्या दिवसांनी मन त्या गाेष्टी विसरूनही जातं.माेठ्यातल्या माेठ्या गाेष्टीही मन विसरून जातं. साेडून द्या, बाजूला सरका.