वाचे बरवें कवित्व। कवित्वीं बरवें रसिकत्व। रसिकत्वीं परतत्व-। स्पर्शु जैसा।। (18.347)

    03-Jun-2023
Total Views |
 
 

Dyaneshwari 
 
ज्ञानेश्वरांच्या साहित्यशास्त्राचे वा काव्यशास्त्राचे वर्णन करणारी ही एक प्रसिद्ध अशी ओवी आहे. ज्ञानेश्वर म्हणतात की, सर्व ॠतूंत शरदॠतू उत्तम. शरदॠतूतील चंद्र आणखी उत्तम आणि पाैर्णिमेचा याेग असेल तर उत्तमच हाेय.वसंतॠतूत ुललेल्या बागेत जावे. आणि त्या ठिकाणी प्रिय व्यक्तीची भेट व्हावी किंवा कमलाचा विकास व्हावा अथवा वाणी कवित्वाने शाेभावी. कवित्वाला रसाळपणा असावा आणि या सुरसतेस परतत्त्वाचा स्पर्श व्हावा.त्याप्रमाणे सर्व मनाेवृत्तीत एक बुद्धीच चांगली असते आणि बुद्धीला इंद्रियांच्या सामर्थ्यांची शाेभा प्राप्त हाेते.ज्ञानेश्वरांच्या पूर्वी काव्याची व्याख्या करताना शास्त्रकारांनी ‘वाक्यं रसात्मकं काव्यम्’ अशी केलेली आहे.असे रसमय वाक्य म्हणजे काव्य हे त्यांनी मानले.
 
पण ज्ञानेश्वर एवढ्यावर संतुष्ट नाहीत, वाणी कवित्वमय असावी हे ज्ञानेश्वरांच्या ओव्यांवरून स्पष्ट हाेते. आणि या ओव्या विविध रसांनी भरलेल्या आहेत. शिवाय या रसत्वाला आत्मतत्त्वाचा स्पर्श झाल. आहे. अशा शब्दरचनेला ज्ञानेश्वरांनी काव्य म्हटले आहे. काव्याची एवढी शास्त्रशुद्ध व चांगली व्याख्या इतरत्र आढळणार नाही.शरीर, जीव, इंद्रिये, त्यांचा व्यापार इत्यादींच्या अधिष्ठात्री देवता आहेत.या देवतांची अनुकूलता प्राप्त व्हावी, दहा इंद्रियांबराेबर सूयादि देवतांचा समुदाय आहे. असे देवांनी सांगितल्याबराेबर अर्जुनाच्या मनास आनंद झाला. अकस्मात वसंतॠतू यावा आणि वृक्षवेलींना नवीन पालवी ुटावी, वर्षाॠतूत मेघांतून जलवृष्टी व्हावी, पृथ्वी धनधान्यांनी समृद्ध व्हावी, पूर्वदिशा अरुणाला विते, अरुणानंतर सूर्याेदय हाेताे. सूर्यामुळे सर्वत्र उजाडते, त्याप्रमाणे कर्मांसंबंधी संकल्प हाेण्याला मन हे कारण आहे.