गीतेच्या गाभाऱ्यात

    03-Jun-2023
Total Views |
 
 
पत्र एकाेणिसावे
 
Bhagvatgita
 
काेणी आपली स्तुती केली की आपण फुशारून जाताे व काेणी आपली निंदा केली की, आपल्याला क्राेध येताे. आपण फुशारून गेलाे किंवा आपल्याला क्राेध आला तर आपल्या मनाचा तराजू बिघडताे. अशा परिस्थितीत काेणी स्तुती केली तर आपण फुशारून जाऊ नये व काेणी निंदा केली तर आपण रागावू नये, याबद्दल उत्कृष्ट उपाय काेणता?’ तुझा प्रश्न फार फार चांगला आहे. त्या प्रश्नाचा अर्थ असा की त्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करावा असे तुला वाटू लागले आहे. स्तुती काय किंवा निंदा काय दाेन्ही सारखेच अशी अवस्था प्राप्त हाेण्याकरता आपण काहीतरी प्रयत्न करावा हा विचार मनात येणे ही भाग्याची गाेष्ट आहे.भक्ताची जी लक्षणे गीतेच्या बाराव्या अध्यायांत दिली आहेत त्यामध्ये एक लक्षण असे आहे की - तुल्यनिंदास्तुति: । त्याला निंदा व स्तुती समान वाटतात.
 
हे लक्षण साधण्याकरता मी खूप प्रयत्न करत असे. काेणी आपली स्तुति केली की फुशारून जाणे व काेणी आपली निंदा केली की आपल्याला राग येणे- ह्या गाेष्टी माझ्या बाबतीत घडत असत. फुशारून न जाण्याकरता व क्राेध न येण्याकरता मी निरनिराळे प्रयाेग केले पण ते यशस्वी झाले नाहीत. नंतर काेणी स्तुति केली अथवा काेणी निंदा केली की मी माैन पाळू लागलाे. हा प्रयाेग मात्र यशस्वी झाला. माैन सुरू झाल्यानंतर आपण अंतर्मुख हाेताे. ईश्वर आपल्या अंत:करणात आहे.अंतर्मुख हाेऊन आपण आत आत जाऊ लागला म्हणजे आपला क्राेध हळूहळू कमी कमी हाेत जाऊन ताे पुढे पूर्ण नाहीसा हाेताे. त्याचप्रमाणे फुशारकीची भावनादेखील हळूहळू कमी हाेतजाऊन ती पूर्ण नाहीशी हाेते.
 
अशा तऱ्हेने प्रयाेग यशस्वी झाल्यामुळे मला खूप आनंद झाला.गीतेमध्ये भ्नताची लक्षणे सांगताना.तुल्यनिंदास्तुतिः या लक्षणानंतर लगेच माैनी असा शब्द वापरला आहे.तुल्यनिंदास्तुति त्या लक्षणानंतर लगेच गीतेने माैनी असा जाे शब्द वापरला आहे त्यामध्ये फार माेठे औचित्य आहे.तुल्यनिंदास्तुतिः हे लक्षण साधणे फार कठीण आहे. गीतेला असे सांगावयाचे आहे की, हे लक्षण साधणे कठीण असले तरी निंदा झाली किंवा स्तुति झाली की लगेच तुम्ही माैन पाळा म्हणजे हे लक्षण साधणे तुम्हाला श्नय हाेईल.गीतेच्या अर्थाबद्दल मला अशी नवीन दृष्टी आली व माझ्या प्रयाेगामुळे माझी खात्री झाली की - तुल्यनिन्दास्तुति: या लक्षणानंतर गीतेने माैनी हा शब्दवापरून फार माेठे औचित्य साधले आहे.तू आपल्या पत्रात लिहितेस - ‘‘गीतेचा पहिला अध्याय अर्जुनविषादयाेग आहे. यात अर्जुनाने आपले काही मुद्दे मांडले आहेत.