नवे कपडे घालत जाता. जे जाणतात त्यांच्या दृष्टीने साधारण मृत्यू हा मृत्यू नव्हेच; ते तर केवळ शरीर बदलणं आहे. घर बदलणं जुनं घर साेडायचं. नव्या घरात जायचं; पण ध्यानात महामृत्यू घडताे. नुसतं शरीरच मरतं असं नाही, तर आपण पण मरता.आपणही मरता, ‘मी पण मरताे. अहंकार, इगाे , मन ही सारी मरतात. नक्कीच जर शरीराच्या मरण्यातच एवढं भय असतं, तर मनाच्या मरण्याचं केवढं भय वाटत असेल? अन् म्हणून म्हटलं आहे की, अभय झाल्याविना काेणीही ध्यानात जाऊ शकत नाही.कृष्णांनी जसं अभय व्हायला सांगितलं तसंच अभय हे पहिलं सूत्र म्हणून महावीरांनीही सांगितलं. अभय झाल्याखेरीज काेणालाहीध्यानात जाता येणार नाही. कारण थाेड्याच वेळात आत गती हाेईल, आणि मग कळेल. अरे हा तर मृत्यू हाेऊ लागला.ध्यानाच्या अनुभवानं मृत्यूचा अनुभव येताेच.
अटळच आहे ते. ताे टाळावा अन् पुढे जावं असं एखाद्याला वाटलं तर पुढं जाताच येणार नाही.आपण ध्यानात जेव्हा खाेल उतराल तेव्हा एक क्षण असा येईल की जेव्हा वाटतं मी मरून तर जाणार नाही ना! त्यापेक्षा परत फिरलेलं काय वाईट? कशाला ही कटकट न् खटाटाेप? असंख्य लाेक ध्यानातून परत मागे वळतात.आतून जे मृत्यूचं भय जाणवतं, त्याच्यामुळेच ते परततात. खरी गंमत अशी आहे की, पार हाेण्याचा हाच क्षण असताे. त्याच क्षणी जर आपण निर्भयपणे प्रवेश करून गेलात तर, आपण समाधीपर्यंत पाेहाेचाल; पण जर तेथूनच परतलात तर जिथून निघाला हाेतात तिथंच परत पाेहचाल.