एवं जगदीश ताे वेगळा। जग निर्माण त्याची कळा ।।1।।

    28-Jun-2023
Total Views |
 
 
 
 
saint
 
हे विश्व निर्माण हाेण्यापूर्वी केवळ पाेकळी हाेती. त्यानंतर वायू मग अग्नी पुढे पाणी अशा रीतीने ही सृष्टी आकारत गेली. त्या सृष्टीतच दगडही असतात. अशा दगडांच्या मूर्ती करून त्यांनाच देव मानणे याेग्य नाही तर अज्ञानपणाचे आहे. सृष्टीनिर्माता परमेश्वर सृष्टी निर्माण करण्यापूर्वीही हाेता हे ध्यानी धरले पाहिजे. निम ार्ता आणि त्याची निर्मिती या दाेन गाेष्टी भिन्न आहेत, हे समजण्यासाठी श्रीसमर्थ वेगवेगळी उदाहरणे देतात. कुंभार घडा तयार करताे; पण घडा म्हणजे कुंभार नसताे. मातीचे सैन्य एखाद्याने तयार केले तर ताे करणारा आणि मातीचे सैनिक वेगवेगळेच असतात.
 
कठपुतळ्यांचा खेळ करणारा त्या बाहुल्या नाचविताे पण म्हणून ताे बाहुली बनत नाही. आणखी एक आणि त्यांच्या काळाच्या पुढील उदाहरणही श्रीसमर्थ आपल्या बुद्धिवैभवाने देतात. पुढे पडदा लावून त्याच्या मागे दिवा ठेवून मध्ये चित्रे नाचवली की पुढे बसणाऱ्या प्रेक्षकांना पडद्यावर ती दिसतात. मात्र चित्रे अनेक असली तरी ती नाचविणारा एकच असताे तसाच सृष्टीमध्ये अनेक जीव निर्माण करणारा देव एकटाच आणि त्या जीवांहून वेगळाच असताे. या सर्व उदाहरणांवरून साधकांनी कर्म आणि ते करणारा कर्ता हे भिन्न असतात हे जाणून घ्यावे.एखादे सुंदर देवालय, त्याची उत्त्ाुँंग गाेपुरे घडविणारा कारागीर आणि त्याची निर्मिती असलेले देवालय हे दाेन्ही जसे वेगवेगळेच असतात.