म्हणजेच हे कालचक्र विश्वनिर्मितीपासून प्रलयापर्यंत जागृत असते. कळी उमलते, ूल माेठे हाेते. नंतर पाकळ्या काेमेजतात, सुकतात आणि शेवटी गळून जातात. विश्वात सर्वत्र हाच जीवनक्रम आहे.माणूसही जन्मताे, वाढताे, तरुण हाेताे.नंतर वृद्ध, राेगी हाेताे. आयुर्मर्यादा कमी-जास्त असू शकते; पण शेवट म्हणजेच मृत्यू हा अटळ आहे.काळाला राेखणे कुणालाच अगदी देवादिकांनाही शक्य नाही.