गीतेच्या गाभाऱ्यात

    28-Jun-2023
Total Views |
 
 
पत्र बाविसावे
 
Bhagvatgita
वर जाे उतारा दिला आहे त्यामध्ये तप, दान, आर्जव, अहिंसा व सत्यवचन या पाच गुणांचा उल्लेख आहे.गीतेने साेळाव्या अध्यायात दैवी संपत्तीचे गुण सांगितले आहेत, त्यामध्ये वरील पाच गुण आहेत; पण तू असे लक्षात घे कीदैवी संपत्तीमध्ये गीतेने फ्नत पाच गुण सांगितले नसून सव्वीस गुण सांगितले आहेत. (गीता अध्याय साेळा.श्लाेक एक ते तीन) नमुन्यादाखल अशा काही गाेष्टी पाहिल्यानंतर तुला कळून येईल की - गीता म्हणजे उपनिषदांचे सार अथवा तात्पर्य हे म्हणणे पूर्णांशाने बराेबर नाही. उपनिषदातील तत्त्वज्ञानामध्ये कृष्णाने स्वत:ची अशी माेलाची भर घातली आहे.उपनिषदांना दूध मानले तर कृष्णाने साखर व केशर घालून प्नवान्न तयार केले असे म्हणता येईल. काही लाेकांना बासुंदी आवडते. तर काही लाेकांना श्रीखंड आवडते. दूध साखर केशर यापासून बासुंदी बनवता येते त्याचप्रमाणे याच तीन जिन्नसापासून श्रीखंड देखील बनवता येते.
 
अलंकारिक भाषेत बाेलायचे म्हणजेउपनिषद्रूपी दूध आटवून त्यात साखर व केशर घालून कृष्णाने केलेली बासुंदी म्हणजे गीता किंवा - उपनिषद्रूपी दुधाचा च्नका करून त्यात साखर व केशर घालून कृष्णाने बनविलेले श्रीखंड म्हणजे गीता उपनिषद.तू आपल्या पत्रांत लिहितेस ‘‘गीतेमध्ये 700 श्लाेक आहेत. त्यामध्ये धृतराष्ट्राचा 1 संजयाचे 41 अर्जुनाचे 84 व कृष्णाचे 574 श्लाेकांत जे सांगितले आहे ते सारे कृष्ण युद्धभूमीवर बाेलला काय? कांही पंडित कृष्णालाच काल्पनिक मानतात. मला ते म्हणणे पटत नाही. कृष्ण ऐतिहासिकपुरुष आहे पण गीतेत कृष्णाचे म्हणून जे भाषण आहे ते सारे कृष्ण युद्धभूमीवर बाेलला काय? गीता श्लाेकबद्ध आहे.
काही भाेळेभाबडे लाेक मानतात की कृष्ण व अर्जुन श्लाेकात बाेलत हाेते. ही भाबडी समजूत साेडून दिली व व्यासांनी कृष्णार्जुन संवादाला काव्यबद्ध केले.
 
असे असले तरी माझी शंका आहे की गीतेत जे कृष्ण बाेलला आहे ते सारे ताे खराेखरच युद्धभूमीवर बाेलला हाेता काय? तुझी शंका चांगली आहे. गीतेच्या गाभाऱ्यांत तू आता सज्ञान झाल्यामुळे सज्ञान माणसाला शाेभतील अशा शंका तू आपल्या पत्रात विचारल्या आहेस.वेबूर म्हणताे की कृष्ण काल्पनिक आहे. त्याचा असा दावा आहे की येशू ख्रिस्ताच्या चरित्रावरून काल्पनिक कृष्ण निर्माण केला गेला. याच्या उलट Christ a Mythया पुस्तकात असे दाखवण्यात आले आहे की कृष्ण ऐतिहासिक हाेता, आणि त्याच्या चरित्रावरून काल्पनिक येशू ख्रिस्त निर्माण करण्यात आला. आता हा वाद मिटलेला आहे, इतिहास, व्याकरण, शिलालेख त्यावरून व निरनिराळ्या विद्वानांनी केलेल्या संशाेधनावरून आता हे निश्चित झाले कीकृष्ण ही ऐतिहासिक व्य्नती हाेती.