संसारात अडकलेला जीव सहजासहजी इतरांसाठी निस्वार्थपणे कांही करणे कठीण आहे.आप-पर ही भावना जाेपासणाऱ्या या जीवाला त्याने केलेल्या कार्यातून समाधान तर मिळावेच वाटते. पण केलेल्या कार्याचे श्रेयही मिळावे वाटते. रुग्णांना, गाेरगरीबांना चार आण्याचे दान, मदत केली तर बारा आण्याची प्रसिध्दी करण्यात हा जीव मागे रहात नाही.आपला उदाे उदाे व्हावा, लाेकांनी आपणाला माेठे, चांगले म्हणावे म्हण्ून खाेटारडा आव आणून हा जीव कांहीतरी खटाटाेप करीत असताे. सर्वच लाेक अशा वृत्तीचे असतात असे नव्हे. कांही बाेटावर माेजण्याइतके लाेक खराेखरच निस्वार्थ भावाने सेवा करतात. आपण केलेल्या कार्याला कार्य न समजता ते सेवा समजतात.
या सेवेचे श्रेय, माेठेपण ते अजिबात अपेक्षित नाहीत. आप-पर हा भेद न जाेपासणे, केलेल्या कार्याचे श्रेय न घेणे, माेठेपणा न स्विकारणे ही साधी बाब नाही. पण संत, महात्म्यांच्या बाबतीत ही बाब सहज घडते. काेणत्याही कार्यात समता, बंधुता, निस्वार्थ प्रेमाशिवाय आपणाला कांही देणे घेणे नाही. हे स्वानुभवातून पांडूरंगाला सांगतांना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जगन्नाथा । हें अन्यथा नव्हे कीं ।। हा अनुभव आपणही घेऊ शकताे.
जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448