चाणक्यनीती

    27-Jun-2023
Total Views |
 

Chanakya 
वाच्यार्थ : काळ सर्व प्राणिमात्रांचा घात करताे; त्यांना गिळंकृत करून पचवताे. काळच सर्वांचा विनाश करताे. चराचराच्या सुप्तावस्थेतही काळ एकटाच जागा असताे; कालक्रम बदलणे अशक्य आहे.
 
भावार्थ : कालमहिमा अपरंपार आहे.
 
1. काळ : काळ सर्व प्राणिमात्रांना अजगराप्रमाणे गिळंकृत करताे आणि पचविताे.काहीही मागे राहत नाही. संपूर्ण जीवसृष्टी, संपूर्ण विश्व निद्रिस्त असताना काळ मात्र जागृतावस्थेत असताे.