गीतेच्या गाभाऱ्यात

    27-Jun-2023
Total Views |


पत्र बाविसावे

Bhagvatgita
हा कर्माचे स्वतंत्र माहात्म्य सांगणारा तात्त्विक सिद्धांत प्रथम गीतेने प्रतिपादला आहे. तात्त्विक विचारात गीतेची ही फार माैलिक भर आहे.आपले कर्तव्य केवळ कर्तव्य म्हणून केले पाहिजे.अशा तऱ्हेने कर्माचे स्वतंत्र माहात्म्य स्वतंत्र स्थान-गीतेने प्रस्थापित केले आहे. कांटचा नियत कर्तव्याचा महान सिद्धांत आहे; पण कांटने हा सिद्धांत सांगण्यापूर्वी फार वर्षे अगाेदर गीतेने कर्तव्य कर्तव्याकरताच हा सिद्धांत मांडला.ईशावास्याेपनिषदातून कर्मापासून अलिप्तता हा पाया गीतेने घेतला व त्या पायावर कर्माच्या स्वतंत्र माहात्म्याची गीतेने रम्य दिव्य इमारत उभारली.गीतेच्या पंधराव्या अध्यायात अश्वत्थ वृक्षाचे वर्णन आहे.या कल्पनेचे मूळ कठाेपनिषदात आहे. त्यांत म्हटले आहेऊर्ध्वमूलाेऽवा्नशाखएषाेऽश्वत्थ: सनातन:। तदेव शुक्र तद्ब्रह्म तदेवामृतमुच्यते।। कठाेपनिषदातील अश्वत्थ म्हणजे ब्रह्म, पण गीतेतील अश्वत्थ वृक्ष म्हणजे संसारवृक्ष.

गीता सांगते की या अश्वत्थवृक्षाला असंगरूपी शस्त्राने ताेडून टाकणेचे आहेयावरून तुला समजून येईल कीकठाेपनिषद व गीता या दाेन्हीमध्ये अश्वत्थ वृक्षाचे वर्णन असले तरी त्याबाबतच्या विचारामध्ये महत्त्वाचा फरक आहे.गीतेमध्ये अश्वत्थ वृक्षाचे वर्णन आहे. त्याचप्रमाणे स्कँडिनेहिनाेच्या पुराणांत इगड्रासिल वृक्षाचे वर्णन आहे.त्या पुराणांत ताे वृक्ष ताेडून टाकणे आपले कर्तव्य आहे असे म्हटले आहे. त्या पुराणांत जे म्हटले आहे त्याच्या पूर्वी फार वर्षे अगाेदर गीतेने सांगितले आहे कीअश्वत्थवृक्ष असंगरूपी शस्त्राने ताेडून टाकणेचा आहे.गीतेच्या अकराव्या अध्यायात विश्वरूपाचे वर्णन आहे. मुडकाेपनिषदात विश्वरूपाचे थाेडेसे वर्णन आहे.पण गीतेने विश्वरूपाचं सविस्तर वर्णन केले आहे.

विश्वरूपाच्या बाबतीत गीता म्हणजे उपनिषदाचे सार अथवा तात्पर्य आहे हे म्हणणे बराेबर नाही विश्वरूपाच्या बाबतीत उपनिषदात जे सांगितले आहे त्यामध्ये गीतेने फार माेठी भर घातली आहे.गीतेने सामवेदाला सर्व वेदामध्ये उच्चतम स्थान दिले आहे.वेदानां सामवेदाेऽस्मि। गीतेपूर्वी किंवा नंतर सामवेदाला सर्व वेदांमध्ये श्रेष्ठपद देण्यात आले नाही. पण गीतेने मात्र सामवेदाला सर्व वेदांमध्ये श्रेष्ठ स्थान दिले. गीतेचे हे मत अपूर्व आहे.एक गंमत म्हणून तुला सांगताे कीछांदाेग्य उपनिषद हे सामवेदाचे उपनिषद आहे. या उपनिषदामध्ये म्हटले आहेतद्धैवतद् घाेर आंगिरस: कृष्णाय देवकीपुत्राय उ्नत्वाेवाच। तपाे दानं आर्जवं अहिंसा सत्यवचनमिति।। यामध्ये देवकीपुत्र कृष्णाचा उल्लेख आहे.ऋग्वेदात कृष्णाचा उल्लेख आहे.अयं वा कृष्णाे अश्विना हवेत वाजिनी वसु। ऋग्वेदात ऋषी म्हणून कृष्णाचा उल्लेख आहे. पण देवकीपुत्र कृष्णाचा उल्लेख काेठेच नाही.छांदाेग्य उपनिषदात कृष्णाला देवकीपुत्र म्हटले आहे.या उपनिषदात देवकीपुत्र कृष्णाचा स्पष्ट उल्लेख आहे हे लक्षांत ठेवण्यासारखे आहे.