जाे जन्मलाच नाही ठाईचा । त्यास मृत्यु येईल कैंचा।।2।।

    22-Jun-2023
Total Views |
 
 

saint 
 
कारण त्यांना देह ही माया आहे, हे सत्य माहीत नसते.खरेतर हे ज्ञानी साधुपुरुष मुक्तावस्थेला पाेचलेले असल्याने त्यांचे जीवन सफल हाेऊन ते अंतिम शुद्ध ब्रह्मज्ञानाला प्राप्त हाेऊन उद्धरून जाऊन धन्य झालेले असतात.एका तऱ्हेची आत्मिक अशरीर अवस्था त्यांना जिवंतपणीच प्राप्त झालेली असते. त्यामुळे त्यांचे शरीर अंतकाळी रानावनात पडले काय किंवा अगदी स्मशानघाटावर पडले काय, त्यांच्या जीवनसाफल्याला त्यामुळे काहीही बाधा येत नाही, हे चिरंतन सत्य आपण जाणले पाहिजे.हे ज्ञान साधकांना संतांच्या संगतीत राहूनच मिळू शकते व म्हणून सत्संगतीसारखे अन्य साधन नाही.
 
एखाद्या आईने आपल्या लेकराची काळजी घ्यावी, इतक्या प्रेमाने सद्गुरू आपल्या शरणागत भक्तांची काळजी घेतात. अशी गुरुसेवा आणि गुरुकृपा ज्याला लाभेल त्याचे जीवन धन्य हाेऊन जाते आणि या सद्गुरूंची आत्मा हाच सत्यवस्तू आहे अशी सिद्धावस्था असल्याने आणि आत्मा अविनाशी असल्याने ऐहिक जगातील जन्म आणि मृत्यू हे त्यांच्या खिजगणतीतही नसतात. कारण विवेकबळाने ते केव्हाच या जन्ममृत्यूच्या पैलतीरी परमात्म्याजवळ स्थिरावलेले असतात. अशा सद्गुरूंना शरण जाऊन परमार्थ मार्गाचे गुह्य जाणून घ्यावे, असेच श्रीसमर्थ साधकांना पुन्हापुन्हा आणि सर्वांचे सार म्हणून सांगत आहेत! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299