पत्र एकविसावे म्हणून त्याने ते लिंग गणपतीजवळ दिले. रावण लघुशंकेस गेल्यावर व ताे लवकर परत येत नाही असे पाहून गणपतीने ते लिंग जमिनीवर ठेवले. रावण मग तेथे आला पण त्याला ते उचलता येईना. ते लिंग तेथेच राहिले. तेच हे ज्याेतिर्लिंग.
(10) श्रीनागेश्वर (द्वारकेजवळ) सुप्रिय नामक एक वैश्य माेठा शिवभ्नत हाेता. दारूक नावाच्या राक्षसाने त्याचा छळ करून त्याला कारागृहात टाकले. तेथे शंकराने त्याला दर्शन दिले व दारूकाचा नाश केला. या ठिकाणी जे लिंग आहे तेच नागेश्वर ज्याेतिर्लिंग.
(11) श्रीरामेश्वर (हिंदी महासागराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ) रामेश्वर आपण यात्रेच्या वेळी पाहिले. या मंदिराच्या आवारात चाेवीस विहिरी आहेत. त्या आपण पाहिल्या. समुद्रकाठी असणारे हे भव्य मंदिर पाहून आपण फार संतुष्ट झालाे. काशीविश्वेश्वराचे देऊळ लहान आहे पण रामेश्वराचे देऊळ फारच भव्य आहे.या लिंगाबद्दल दाेन आख्यायिका आहेत.पहिली आख्यायिका अशी की- लंकेत जाण्यापूर्वी शिवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रभु रामचंद्रांनी हे शिवलिंग स्थापन केले.दुसरी आख्यायिका अशी की रावणाचा वध करून आल्यानंतर ब्रह्महत्येच्या पापक्षालनार्थ प्रभु रामचंद्रानी या शिवलिंगाची स्थापना केली.
(12) श्रीघृष्णेश्वर (वेरूळजवळ) सुधर्म नावाच्या ब्राह्मणाची स्त्री शिवभ्नत हाेती. तिच्या सवतीने तिच्या मुलाची हत्या करून त्याचे प्रेत येथील सराेवरांत टाकले, पण शिवाच्या कृपेने ताे जिवंत हाेऊन बाहेर आला. त्या साध्वी स्त्रीने आपल्या सवतीबद्दल शंकराकडे क्षमायाचना केली. शंकर तिच्यावर प्रसन्न झाले व तिच्या प्रार्थनेवरून तेथे ज्याेतिर्लिंगरूपात राहिले.शिवपुराणात या बारा ज्याेतिर्लिंगांबद्दल असे म्हटले आहे कीद्वादशैतानि नामानि प्रातरूत्थाय य: पठेत्। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति।। प्रात:काळी उठून जाे ही बारा नावे म्हणेल त्याचे स्मरणमात्रे सात जन्मांचे पाप नाहीसे हाेईल.
ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीचा उगम शंकरापर्यंत पाेचवला आहे. त्याबाबतीत खालील श्लाेक लक्षात ठेवण्यासारखा आहे.आदिनाथं च मच्छेद्रं गाेरक्षं गहिनीं तथा। निवृत्ति ज्ञाननाथं च भूयाे भूयाे नमाम्यहम्।। तू आपल्या पत्रात तत्त्वाबद्दल विचारले आहेस, त्याबाबतीत तू असे लक्षांत घे कीइतर दर्शनकार चाेवीस किंवा पंचवीस तत्त्वे मानतात तर शैव छत्तीस तत्त्वे मानतात, ती तत्त्वे अशी- (1) शिवतत्त्व (2) श्निततत्त्व (3) सदाशिवतत्त्व (4) ईश्वरतत्त्व (5) शुद्धविद्यातत्त्व (6) माया (7) काल (8) नियति (9) कला (10) विद्या (11) राग (12) पुरुष (13) प्रकृति (14) बुद्धी (15) अहंकार (16) मन (17 ते 21) पांच ज्ञानेंद्रिये (22 ते 26) पांच कर्मेंद्रिये (27 ते 31) पंच तन्मात्रा (32 ते 36) पंच महाभूते गीतेमध्ये तेराव्या अध्यायात असे श्लाेक आहेत-