ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी गीतेचे व व्यासांचे माहात्म्य सांगताना वरील ओवी लिहिली आहे. गीतेच्या निमित्ताने ब्रह्म कानाने, मुखाने भाेगता येण्यासारखे झाले. श्रीकृष्णांच्या बाेलण्याला ग्रंथरूप देऊन व्यासांनी जगावर माेठाच उपकार केला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात की, व्यासांची पदे प्रमाण मानून मी ती मराठी भाषेत आणण्याचा प्रयत्न केला आहे. गीता व्यासांसारख्या थाेर कवीने श्लाेकबद्ध केली आहे. ज्ञानेश्वर म्हणतात की, त्यामानाने मी एक साधा मनुष्य बडबड करीत आहे. हा विचार स्पष्ट करताना ज्ञानेश्वर नेहमीप्रमाणे एकाहून एक सरस असे दृष्टांत देतात. ते म्हणतात की, गीता हा भाेळा शंकर आहे. ताे व्यासवचनांच्या ुलांची माळ धारण करताे. तरी माझ्या दुर्वादळांना म्हणजेमराठी ओव्यांना ताे नाही म्हणणार नाही.
क्षीरसमुद्राच्या किनाऱ्याला पाणी पिण्यासाठी हत्तींचे समुदाय येतात तेथे ताे समुद्र चिलटांना नकाे म्हणेल काय? आकाशाचे आक्रमण गरुडपक्षी करताे, पण नुकतेच पंख ुटलेल्या पाखराने उडू नये काय? राजहंसाचे चालणे डाैलदार तर खरेच, पण म्हणून इतर काेणी चालूच नये काय? घागरीने पुष्कळ पाणी भरता येते, म्हणून काेणी चूळ भरू नये काय? मशाल माेठा प्रकाश दाखवते, तरी लहान वातीने प्रकाशू नये काय? समुद्राच्या विस्ताराच्या मानाने त्याच्यात आकाशाचे प्रतिबिंब पडते आणि डबक्यातही तेच दिसते, त्याप्रमाणे व्यासांची विशालबुद्धी स्मरून आम्ही ग्रंथाचे विवरण का करू नये? सूर्याच्या जवळचा अरुण सूर्याला पाहताे, त्याप्रमाणे पृथ्वीवरची मुंगीही त्याला पाहते. अशा रीतीने सामान्य लाेकांसाठी देशी भाषेत मी गीता आणली हे अयाेग्य केले काय? या सर्व विवेचनात ज्ञानेश्वरांचे नम्रत्वही प्रतीत हाेते.